माहूरगड (जि. नांदेड) : पुसद येथील वाचक नितीन अजमिरे यांनी ड्रोनने टिपलेला माहूर गडावरील विलोभनीय दृश्‍य. 
विदर्भ

देवी रेणुकेचा माहूरगड देतोय प्राणवायूचे धडे, ड्रोनने टिपले हिरवे लेणे

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी श्रीविष्णूंनी सह्याद्रीच्या रांगांमध्ये 'माहूर'चे अद्भुत मॉडेल तयार केले. नंतरच ब्रह्मदेवाने सृष्टीत जीवाशिवांची शिंपण केली. या आख्यायिकेत खोलवर न जाता 'ड्रोन'ने क्‍लिक केलेले माहूरगडाचे आजचे ताजे छायाचित्र या पार्श्वभूमीवर मनोवेधक ठरते आहे.

खरोखरच या दृश्‍यात ब्रह्मदेवाची सृष्टी अपूर्वाईच्या हिरव्या लेण्यांनी समृद्ध झालेली पाहताना अंत:करणापासून मन जगतपिता निर्मात्याला सलाम केल्याशिवाय राहत नाही.

महाराष्ट्रातील शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या माहूरगडावर नवरात्राला प्रारंभ झाला. रेणुका देवीचा गजर माहूर गडाच्या चराचरांत ऐकावयास मिळतो. माहूरगड ऊर्जास्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. गडावर पायऱ्या चढताना श्वास भरून येतो. उंच शिखर गाठल्यावर मनाला एकदम तरतरी येते.

माहूरगडात हिरवाईचे लेणे

माहूरगडाचे हिरवाईचे लेणे म्हणजे प्राणवायूच्या जणू लहरी. हाच वनराईतून मिळणारा प्राणवायू मनाला तजेला भरतो. देवीवरचा प्रचंड विश्वास हा भाविकांच्या प्रत्येक श्वासात भरलेला पाहावयास मिळतो. हा प्राणवायूने भरलेला श्वास ब्रह्मदेवाच्या सृष्टीतून विनासायास प्राप्त होतो, हेच सृष्टीचे देवत्व नव्हे का?

'जान हैं तो जहान है'

कोरोनाच्या काळात कोविड विषाणूने जीवाचे महत्त्व पटवून दिले. 'जान हैं तो जहान है'. श्वासावरील विश्वास दृढ केला. जिवंत राहावयाचे असेल, तर श्वासाचा भाता चालला पाहिजे. त्यासाठी प्राणवायूची आवश्‍यकता आहे. हा प्राणवायू ब्रह्मदेवाच्या शृष्टीतील हिरवाईच्या लेण्यांमधून मुक्तपणे उपलब्ध होतो. त्यामुळे वनराई जपण्याचा मौलिक संदेश आदिशक्तीच्या रेणुका गडावरून सहजपणे मिळतो. आकाशातून गडावरील हिरवाई व जलाशयांनी मंतरलेला भूभाग पाहताना कोणीही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. देवीचा जागर म्हणजे श्वासांचा जागर. प्राणवायूचे आगर आणि त्यासाठी नवरात्रात भरून आलेली माहूरगडावरील ब्रह्मसृष्टी. या हिरवाईने नटलेल्या सृष्टीची आराधना म्हणजेच रेणुका भक्ती नव्हे का?


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Elections: घड्याळासोबत जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी केलं शिक्कामोर्तब

एर्नाकुलम एक्सप्रेसच्या २ डब्यांना भीषण आग, दुर्घटनेत एकाचा मृत्यू; VIDEO VIRAL

Sachin Pilgaonkar : 'पहिल्या चित्रपटानंतर आईला वाटलं मी अभिनय करू नये, पण वयाच्या पाचव्या वर्षी...'; सचिन पिळगावकरांनी सांगितला 'तो' किस्सा

Gold Rate Today : आठवड्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात घसरण; चांदीही सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

साऊथ सुपरस्टार थलपती विजयने केली निवृत्तीची घोषणा, 'जय नायकन' शेवटचा सिनेमा असणार, म्हणाला...

SCROLL FOR NEXT