daughter throw hot oil on father read full story  
विदर्भ

हृदयद्रावक घटना! मुलीने जन्मदात्यावर टाकले उकळते तेल.. क्रूर मुलगी पसार.. वाचा सविस्तर  

शैलेश उरकुडे

लाखनी (जि. भंडारा) : तालुक्‍यातील चिचगाव येथे वडिलांचे बोलणे असहाय्य झाल्याने मुलीने जन्मदात्याच्या अंगावर गरम तेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमीचे नाव मनोज महादेव रामटेके (वय 47 वर्ष) असून पोलिसांनी यातील क्रूर मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिचगाव येथील मनोज रामटेके याच्या 25 वर्षीय मुलीने तीन वर्षांपूर्वी जवळच्या गावातील युवकासोबत प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून ती पतीसोबत त्याच्या गावी राहत होती. परंतु, घरगुती कारणावरून दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाले. त्यामुळे एक वर्षापासून ही माहेरी परत आली. शुक्रवारी (ता. सात) तिच्यासोबत वडिलांचे भांडण झाले. यात त्याने प्रेमविवाह केल्यानंतर पतीला कां सोडले? तुझ्या वागणुकीत सुधारणा कर असे म्हटले. याबाबत मुलीने आपल्या मनात राग धरून ठेवला. 

रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तिने वडील मनोज रामटेके याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर कढईतील उकळते तेल टाकले. यामुळे त्याचे डोके, संपूर्ण चेहरा, मान, छातीचा भाग, पाठ व दोन्ही खांदे गंभीररीत्या भाजले. यानंतर मुलगी घरून पळून गेली. गंभीर जखमी झालेला मनोज रामटेके तडफडत असल्याने मुलगा व पत्नी यांनी रुग्णवाहिकेद्वारे त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमी मनोज रामटेके भंडारा येथील सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्रमांक19 मध्ये उपचार घेत आहे. या घटनेत तो 40 टक्के भाजल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली आहे.

भंडारा पोलिसांनी रुग्णालयातील वैद्यकीय अहवालावरून या घटनेची नोंद करून तपासासाठी प्रकरण लाखनी पोलिसांकडे पाठवले आहे. जन्मादात्याच्या अंगावर उकळते तेल ओतणारी क्रूर मुलगी घटनेच्या दिवसापासून पसार असून पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर, पोलिस शिपाई मुकेश गायधने तिचा शोध घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चिंचपोकळीचा चिंतामणीही मार्गस्थ

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : कल्याणमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरली

SCROLL FOR NEXT