death in dam.jpg 
विदर्भ

सुट्टीमुळे तिघांना पोहण्याचा मोह आवरला नाही अन् घडले असे...

सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि.बुलडाणा) : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू सुरू असताना चिखली शहरातील काही युवकांना सुट्टीचा दिवस म्हणून आनंद लुटण्याचा मोह आवरता आला नाही. यातूनच शहरातील वायझडी धरणात पोहण्याकरिता गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (ता.22) दुपारी 3.30 वाजेदरम्यान घडली.

पोलिस सूत्रांच्या प्राप्त प्राथमिक माहितीवरून, स्थानिक इंदिरा नगर गौरक्षणवाडी परिसरातील आसिफ खान सिकंदर खान व त्याचा लहान भाऊ अजीम खान सिकंदर खान व त्यांचे दाजी शेख आसिफ हे तिघे जनता कर्फ्युमुळे असल्याकारणाने चिखली शहरातील वायझडी धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आसिफ खान सिकंदर खान या तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

तो पर्यंत प्राणज्योत मावळली
या युवकाला कुटुंबातील लोकांनी धरणात शोधाशोध घेतली असता जवळपास 2 तासानंतर युवकाचा मृतदेह मिळून आल्यावर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले, तो पर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती. मृतक युवक हा मंदबुद्धी असल्याची चर्चा नागरिक करीत होते. सदर मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता चिखली येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. या घटनेचा पुढील तपास पोलिस स्टेशन चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पांडुरंग शिंदे, सदानंद चाफले व गोरखनाथ राठोड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Ajit Pawar work documentation : अजित पवार यांच्या कार्याचा समृध्द दस्तऐवज तयार होणार, ३५ वर्षातील कार्याला उलगडा होणार

Latest Marathi News Live Update : वर्धा-तुळजापूर दरम्यान जीटी एक्सप्रेसला भीषण आग

Exam Paper Burning: बीडमध्ये कॉपीचे गठ्ठे जाळतानाचे व्हिडिओ समोर; सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई होणार, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ!

Justice for Sahil: "मी त्याला २३ वर्षे एकटीने वाढवलं, जपलं..."; स्टंट करताना स्कॉर्पिओने मुलाला चिरडले, एकट्या आईची न्यायासाठी धडपड

SCROLL FOR NEXT