विदर्भ

शेतातील लाइट लावताना शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कलगाव (जि. यवतमाळ) : दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शेतातील लाइट लावताना शेतकऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. लक्ष्मण पुंडलिक उमरकर (वय ६५, रा. डेहणी) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मण हे महाळीवरा रोडवर असलेल्या शेतात शनिवारी (ता. १८) चक्कर मारायला गेले होते. शेतात असलेला लाइट लावत असताना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विद्युत धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी लक्ष्मण उमरकर हे घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. मुलाने शेतात जाऊन पाहिले असता विद्युत प्रवाह लागून त्यांचा मुत्यू झाल्याचे दिसले.

यानंतर घटनेची माहिती पोलिस पाटील यांना देण्यात आली. रात्रभर घटनास्थळीच मृर्तदेह पळून होता. रविवारी सकाळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी आर्णी रुग्णालय येथे पाठविण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगा, चार विवाहित मुली नातवंडे असा अप्त परिवार आहे. पोलिसांनी आकस्मिक मूत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; कोयता गँग, ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवार यांचे पोलिसांना निर्देश

Prithviraj Chavan : मतदारसंघ पुनर्रचना करा, मात्र राज्यांचे जागावाटप बदलू नका; खासदारसंख्या वाढवण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले स्पष्ट

TDR Rules Pune : पुणे महापालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना दणका; टीडीआर आणि प्रीमियम एफएसआय देण्याबाबत आयुक्तांचे कडक परिपत्रक

Health Minister : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पाचोड ग्रामीण रुग्णालयाला रात्री अचानक भेट; रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

Delimitation Commission: SIR नंतर आता मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारीही ज्ञानेश कुमार यांच्याकडेच?

SCROLL FOR NEXT