death of woman after her scarf got caught in belt of flour mill navegaon bandh gondia Sakal
विदर्भ

Gondia : क्षणार्धात झाले डोके धडापासून वेगळे; नवेगावबांध आझाद चौकातील घटना, गोंदिया हादरलं

Gondia News : पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे पाठविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवेगावबांध ( जि. गोंदिया) : गळ्यातील ओढणी पीठ गिरणीच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे महिलेचे डोके धडापासून वेगळे होऊन सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ( ता. २८) सायंकाळी ४.३० च्या सुमारास आझाद चौकातील हर्षल उजवणे यांच्या पीठ गिरणीत घडली.

नीतू हर्षल उजवणे(वय ४६, रा. नवेगावबांध) असे मृत महिलेचे नाव आहे. येथील आझाद चौकात हर्षल उजवणे यांची पीठ गिरणी आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास त्यांच्या पत्नी नीतू या नेहमीप्रमाणे गिरणीवर दळण दळत असताना त्यांच्या गळ्यातील ओढणी गिरणीच्या पट्ट्यात अडकली.

त्यामुळे त्यांचे डोके पीठ गिरणीच्या चाकात अडकले आणि क्षर्णाधात धडापासून वेगळे झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नीतू यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे गिरणी परिसर व रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस ठाण्याच्या ठाणेदार योगिता चाफले आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे पाठविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT