navneet rana and ravi rana sakal
विदर्भ

Maharashtra Politics News : 'तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर, नाहीतर…'; भुजबळ, मुंडेंनंतर आता राणांना धमकी

रोहित कणसे

Navnit Rana Ravi Rana News : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी देखील फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर, नाहीतर तुझ्या जीवाचे काहीतरी करून टाकू... असा धमकीचा फोन रवी राणा यांना करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रवी राणा यांना औरंगाबाद येथील अर्जुन लोखंडे नावाच्या व्यक्तीकडून जीवे धमकी आल्याचा आरोप आहे. तू आमच्या विरोधात कसा काय बोलतो, एवढ्या वेळेस थांब नाहीतर तुला संपवून टाकतो, अशी धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर... नाहीतर तुझ्या जीवाचे काही तरी करून टाकू... अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको... अशी धमकी दिल्याचा देखील पोलीस तक्रारीत उल्लेख आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादांच्या गटासोबत गेलेल्या छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडे यांना देखील धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली होती. मुंडे यांच्या परळ येथील निवासस्थानी धमकीचा फोन करत धमकी देणाऱ्या व्यक्तीनं त्यांच्याकडं ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा केला होता. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT