विदर्भ

‘पतीने म्हटले, माझेही मत ऐकून घ्या’! दीपाली आत्महत्येप्रकरणी अर्ज

सकाळ वृत्तसेवा

परतवाडा (जि. अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी (Deepali Chavan suicide case) निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारने (Vinod Sivakumar) जामीन अर्ज दाखल केला आहे. दुसऱ्या बाजूने दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी (Application of husband Rajesh Mohite) न्यायालयात अर्ज सादर करून पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आपलेही मत नोंदवून घ्यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी शनिवारी (ता. १९) होणार आहे. (Deepali-Chavan-suicide-case-husband's-application-in-court)

दीपाली चव्हाण हिने हरिसाल येथे शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पती, आई आणि व्याघ्रप्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्या नावे स्वतंत्र पत्रे लिहिली होती. त्यात गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळाबद्दलची माहिती दिली होती.

शिवकुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असतानाच दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी अचलपूर न्यायालयात स्वत: अर्ज सादर करून याप्रकरणी आपलेही मत नोंदवून घ्यावे, अशी विनंती केली. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाची कल्पना राजेश मोहिते यांना दीपाली चव्हाण यांनी दिली होती. त्यामुळे ते न्यायालयात काय माहिती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याप्रकरणाची आता शनिवारी (ता. १९) पुढील सुनावणी होईल, असे सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड. डी. ए. नवले यांनी सांगितले. प्रथम तदर्थ व सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीलवार यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

(Deepali-Chavan-suicide-case-husband's-application-in-court)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मराठा आंदोलनामुळे दरदिवशी मोदींची सभा’

आपण सगळे भारतीय आहोत!

लस, गैरसमज आणि आव्हान!

Neeraj Chopra : अवघे 2 सेंटीमीटर... नीरज टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला

जगणं शिकवणारा बापमाणूस!

SCROLL FOR NEXT