Deepali Chavan suicide case Reddys bail application rejected by court 
विदर्भ

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण : रेड्डीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

परतवाडा (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अपर मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा जामीन अर्ज अचलपूर न्यायालयाने शनिवारी फेटाळला. न्यायाधीश एस. के. मुंगीलवार यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. परीक्षित गणोरकर यांनी, तर रेड्डी यांच्या वतीने ॲड. डी. के. वाधवानी यांनी युक्तिवाद केला.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धारणी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रेड्डी यांच्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर सुनावणी झाली.

शनिवारी धारणी पोलिसांनी तो दाखल केला. त्यानंतर रेड्डी यांचे वकील ॲड. वाधवानी व सरकारी वकील ॲड. गणोरकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. पोलिसांनी या प्रकरणात रेड्डी यांचे बयाणसुद्धा नोंदविले. अटक करायची असती तर पोलिसांनी बयाण नोंदवितानाच केली असती. त्यामुळे जर गुन्हाच दाखल नाही तर जामीन अर्जाची आवश्‍यकता नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

रेड्डी यांचे वकील ॲड. वाधवानी यांनी एम. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा कधीही दाखल होऊन अटक होऊ शकते. त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करायचा असल्यास सात दिवसांपूर्वी नोटीस द्यावी किंवा अटकेपूर्वी तशी माहिती द्यावी, असे न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने रेड्डी यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे सरकारी वकील ॲड. परीक्षित गणोरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला दोन सामन्यांतही डेब्यू का नाही? अखेर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

'सगळ्या अ‍ॅक्टरचे अफेअर्स असतात' फराहने प्रश्न विचारताच रितेशने दिली 'अशी' प्रतिक्रिया, Viral Video

Sonai News : सोनईतील सावित्री सत्यवानासाठी आधार‘वड’; पतीला कोरोनात अंधत्व आल्यानंतर कुटुंबासाठी ‘ती’चा अहोरात्र संघर्ष

SCROLL FOR NEXT