delivered woman was Stitches 
विदर्भ

धक्कादायक! प्रसुत महिलेस चुकीच्या ठिकाणी लावले टाके; या रुग्णालयात असाही बेजबाबदारपणा

सकाळ वृत्तसेवा

जऊळका (रेल्वे) (जि.वाशीम) : जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलेस टाके मारताना चुकीच्या पद्धतीने लावले. त्यामुळे नैसर्गीक विधीस बाधा निर्माण झाली आहे. हा प्रकार पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा बेजबाबदारपणा उघडकीस येत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी बाळांतीन महिलेच्या वडिलांनी केली आहे.

येथील गरोदर महिलेला प्रसुती वेदना झाल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जऊळका येथे दाखल करण्यात आले. तेथून गरोदर महिलेला वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवारी (ता.8) गरोदर महिलेची नैसर्गीकरित्या प्रसुती झाली. त्यानंतर डॉक्टरांनी टाके लावले. मात्र, हे टाके हलगर्जीपणाने चुकीच्या ठिकाणी लावण्यात आले. त्यामुळे नैसर्गीक प्रातःविधीस बाधा निर्माण झाली. ही बाब बाळांतीन महिला घरी गेल्यानंतर लक्षात आली. त्यामुळे बाळांतीन महिलेच्या वडिलांनी जऊळका प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली. 

त्यामुळे हे टाके चुकीच्या पद्धतीने लावल्याचे सांगितले. याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयात विचारणा केली असता, त्यांना उलट उत्तरे देत, ‘ग्रामीण भागातील डॉक्टरांना काही समजत नाही’ असे सांगितले. त्यामुळे हा सर्व प्रकार रुग्णांच्या जिवित्वाशी खेळल्याचा आहे, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर खासगी रुग्णालयात उपचारासाठी खूप खर्च येतो, हा खर्च गरीब वडिलांना झेपावणारा नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन, न्याय द्यावा
मी, मोलमजुरी करणारा व्यक्ती आहे. माझी आर्थिक स्थिती हालाखीची आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी लावलेले टाके काढण्यासाठी खासगी रुग्णालयात खर्च करण्याएवढी रक्कम माझ्याकडे नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन, न्याय द्यावा.
-कैलास रमेश ढवळे, रा. जऊळका (बाळांतीन महिलेचे वडील)

कदाचित अ‍ॅटोमॅटीक हिलिंग प्रोसेसची शक्यता
जऊळका येथील गरोदर महिलेची शुक्रवारी (ता.8) प्रसुती जिल्हा सामान्य रुग्णालयात झाली. तसेच प्रसुत महिलेच्या सांगण्यानुसार कदाचित अ‍ॅटोमॅटीक हिलिंग प्रोसेसची शक्यता वाटत असून, पी.व्ही. केल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील. प्रसुत महिलेस आम्ही तातडीने अ‍ॅडमीट करून घेत आहोत. तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT