File photo 
विदर्भ

रस्त्यावर प्रसूती! सायकल रिक्षाने गाठावे लागले रुग्णालय

सकाळ वृत्तसेवा

मोर्शी (जि. अमरावती) : शासकीय रुग्णवाहिकेच्या अभावाने एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या, भर चौकात प्रसूत होणाऱ्या अन्‌ वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवतीचा मृत्यू झाला. मनाचा थरकाप उडविणारा प्रवास अनेकांना चटका लावून गेला. या घटनेने आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशिला टांगल्या गेली.
आशा परशुराम बारस्कर (वय. 35) असे त्या महिलेचे नाव. वरुड तालुक्‍यातील जरुड येथील ही महिला होती. वरुड येथून तिला अमरावतीला रेफर करण्यात आल्यावर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तेथील डॉक्‍टरांची होती, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे एस.टी. बसने अमरावतीकडे जाण्याचा निर्णय तिला घ्यावा लागला. बसने प्रवास करीत असताना प्रसूती वेदना अधिक वाढल्या व मोर्शीच्या जयस्तंभ चौकात तिच्या वेदना असहाय्य झाल्या. अशावेळी एस.टी.च्या चालकाने तातडीने बस ग्रामीण रुग्णालयात नेणे आपेक्षित होते. परंतु येथेसुद्धा तिची अवहेलना झाली व वाहकाने या महिलेला जयस्तंभ चौकात उतरवून बस समोर दामटली. त्याचवेळी सुदैवाने चौकात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य कमर अली लियाकत अली यांच्या लक्षात त्या महिलाचा त्रास आला व त्यांनी तत्काळ येथील शासकीय रुग्णालयातील आया कमलाबाई यांना आपल्या मोटरसायकलवर बसवून जयस्तंभ चौकात आणले. मात्र, संबंधित महिलेला रुग्णालयात हलविण्याची कोणतीच संधी त्यांना मिळाली नाही व भर रस्त्यावर सदर महिलेची प्रसूती झाली. प्रसूतीनंतरसुद्धा शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सदर महिला व तिच्या बाळाला एका मालवाहू रिक्षामध्ये घालून मोर्शीच्या रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तिला उपचार मिळतील, असे वाटत असताना तिची प्रकृती गंभीर झाल्याने तेथील डॉक्‍टरांनीसुद्धा या महिलेला अमरावतीला रेफर केले, तिच्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, मात्र दिवसभराच्या मरणयातनांनी तिचा बळी घेतला अन्‌ अमरावतीच्या रुग्णालयात पोचण्याआधीच तिने जीव सोडला.

कुचकामी शासकीय व्यवस्था
महाराष्ट्र शासनाने 108 व 102 सारख्या आपत्कालीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र वरुड व मोर्शी सारख्या मोठ्या तालुक्‍यातसुद्धा एखाद्या अतिशय गरजू महिलेला वेळेवर या व्यवस्था उपलब्ध होऊ नयेत याबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. जननी- शिशू सुरक्षा कार्यक्रमावर लक्षवेधी रुपये खर्च करूनसुद्धा त्याचा काहीच फायदा नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंगली हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : मोहोळ नगर परिषदेच्या दोन प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

SCROLL FOR NEXT