dengue is spreading in all over amravati read full story  
विदर्भ

अमरावतीकरांनो सावधान! कोरोनासोबतच या आजाराचे अमरावतीत थैमान..मनपासमोर उभे राहिले नवे संकट..

कृष्णा लोखंडे

अमरावती: जिल्हयाभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. त्यात नागरिक प्रशासनाच्या नियमांचे पालन न करत असल्यामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तब्बल पाचशेवर रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र इकडेकडे कोरोनाचे संकट तर आता दुसरीकडे मात्र एका आजाराने अमरावतीमध्ये दहशत पसरली आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात साथीचे रोग पसरणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र या वर्षी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. कोरोनाचा सामना करण्याचे आव्हान असतानाच अमरावती महापालिकेसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करत असतानाच आता महापालिका प्रशासनाला हा जीवघेणा आजारही दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.    

या रोगाचे संकट 

पावसाळा सुरू झाल्याने दरवर्षी डेंगीच्या साथरोगाची सुरुवात होते. अमरावती महापालिकेसमोर डेंगी या विषाणूजन्य साथरोगाचे आव्हान उभे ठाकले आहे. डेंगीचे दरवर्षी शेकडो रुग्ण महानगरात आढळतात. गेल्या वर्षी त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. यंदा कोरोनाचे संक्रमण सुरूच असल्याने डेंगीचा प्रादुर्भाव तापदायक ठरणार आहे. कोरोनाही डेंगीच्या साथीला असल्यामुळे प्रशासनासमोरील संकट दुप्पट झाले आहे.  

सर्वपक्षीय बैठक 

या आजारावर नियंत्रण राहावे, यासाठी पूर्वतयारी म्हणून आयुक्तांनी महापौरांच्या अध्यक्षतेत सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या वेळी महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता अब्दुल नाजीम अब्दुल रऊफ, गटनेता दिनेश बूब, गटनेता चेतन पवार, नगरसेवक मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. सीमा नेताम उपस्थित होते.  त्यामुळे या साथीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आधीच उपाययोजना करण्याच्या सूचना सोमवारी महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. 

राबवणार या उपाययोजना 

डासांची उत्पत्ती रोखण्यावर भर देण्यासोबतच उत्पत्तीची ठिकाणे शोधून ते नष्ट करण्यास प्राधान्य देण्यात यावे, गप्पी मासे सोडण्यात यावे सोबतच फवारणी व धुवारणीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, अशाही सूचना या वेळी करण्यात आल्या.

पूर्वानुभव लक्षात घेऊन उपाययोजना आवश्‍यक

तीन वर्षांपूर्वी डेंगीच्या साथरोगाने महानगरात चांगलेच थैमान घातले होते. शेकडो रुग्ण या साथरोगाचे आढळले. कालांतराने हा मुद्दा राजकीय बनला व आंदोलने झालीत, महापालिकेस वाईट प्रसंग अनुभवावे लागले. आजार कमी व राजकीय वादच अधिक, असा प्रकार घडला आहे. त्यामुळे पूर्वानुभव लक्षात घेऊनच आयुक्तांना आरोग्य विभागाकडून नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT