washim bajar.jpeg 
विदर्भ

प्रशासनाच्या आवाहनानंतरही भरला बाजार!

सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि. वाशीम) :‘कोरोना’ या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. त्याच धर्तीवर येथे भरणारा बुधवारचा आठवडी बाजार रद्द करण्याबाबत नगर परिषदेने आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार भरविला. त्यानंतर नगरपंचायतीकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही.


नगर पंचायत प्रशासनाने केले होते आवाहन
‘कोरोना’चा संसर्ग होऊनये याकरिता देशभर प्रभावी उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. यात्रा, जत्रा, धार्मिकस्थळे, क्रीडा स्पर्धा यांसह गर्दी होणारी ठिकाणे बंद ठेवण्यात आली. लग्न समारंभासारखे कार्यक्रम देखील मोजक्‍याच मंडळींच्या उपस्थितीत पार पडत आहेत. आदी बाबी पाहता सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळत आहे. याच दृष्टीने बुधवारी (ता.18) भरणारा येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत नगर पंचायत प्रशासनाने आवाहन केले होते. नागरिकांना माहिती व्हावी या दृष्टीने ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली. मात्र, यासर्व उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून आठवडी बाजार थाटण्यात आला. हा आठवडी बाजार येथील दिग्रस चौक ते बसस्थानक, पोलिस ठाण्याच्या प्रांगणापर्यंत भरला. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खरेदीकरिता एकच गर्दी केली होती. हीबाब पाहता नगपंचायत प्रशासनाने दिलेल्या सूचना केवळा कागदोपत्रीच बघायला मिळाल्या.


कारवाईची उदासीनता
आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत नगरपंचायतीने आवाहन केले. मात्र, त्यानंतरही आठवडी बाजार भरविण्यात आला. याबबात स्थानिक प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षीत होते. कारण, या बाजारात हजारोंच्या संख्येने नागरिक एकत्रीत आले. मात्र, याबाबत कारवाईसाठी कुठलाही शासकीय अधिकारी बाजारात फिरल्याचे दिसून आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT