Teacher esakal
विदर्भ

Bogus Disabled Teacher : बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड; शिक्षण मंत्रालयाने मागितला अहवाल

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत विविध प्रकारे लाभ घेणाऱ्या तालुक्यातील बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड पडणार

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा - बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत विविध प्रकारे लाभ घेणाऱ्या तालुक्यातील बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड पडणार असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बनावट दिव्यांग शिक्षकांचे सविस्तर अहवाल व स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त पुणे यांना दिले आहे. या अनुषंगाने तालुक्यातील असंख्य बोगस दिव्यांग शिक्षकांवर कठोर कारवाईचे संकेत मिळाले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्राच्या आधारे विविध शासकीय लाभ मिळवणाऱ्या दिव्यांग शिक्षकांचा मुद्दा अलीकडील काळात गाजला होता. महाराष्ट्र शासन युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी बनावट दिव्यांग शिक्षकांकडून शासनाची फसवणूक होत असल्याबद्दलची रीतसर तक्रार नोंदविली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने नुकतेच शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांना एका पत्राद्वारे बुलडाणा जिल्ह्यासह देऊळगाव राजा तालुक्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडून शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल तसेच, इच्छेनुसार बदली संदर्भात शासकीय लाभ घेणाऱ्या शिक्षकांबद्दल चंद्रकांत खरात यांच्या तक्रारीनुसार सविस्तर अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्राय सह तात्काळ शासनास सादर करण्याचे निर्देश एका पत्राद्वारे दिले आहे.

दरम्यान तालुक्यातील असंख्य शिक्षकांवर प्रशासकीय कारवाईची कुऱ्हाड पडणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात जास्त देऊळगाव राजा तालुक्यात दिव्यांग शिक्षक असल्याची नोंद शिक्षण विभागाच्या दप्तरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT