devendra Fadanvis 
विदर्भ

निवडणुकीत "मी पुन्हा येईन' म्हणाल्यामुळे फडणवीस अडचणीत?

सकाळवृत्तसेवा

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान "मी पुन्हा येईन' असे म्हणून लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीचा भंग केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात ऍड. सतीश उके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिवाणी अर्ज दाखल केला आहे. यावर ऍड. उदय डबले यांना वकीलनामा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांचा वेळ दिला आहे. 

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईल' या शब्दाचा उच्चार वारंवार केला. असा उच्चार करणे म्हणजे निवडणुकीचा निकाल आधी जाहीर करण्यासारखे झाले. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार उमेदवार निकाल जाहीर करू शकत नाही, असा आरोप अर्जातून केला आहे. 

दक्षिण-पश्‍चिम नागपूर निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात ऍड. सतीश उके यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर आज सुनावणी झाली. ऍड. उकेंनी आज दाखल केलेल्या अर्जानुसार, 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईल' या शब्दाचा उच्चार वारंवार केला. असा उच्चार करणे म्हणजे निवडणुकीचा निकाल आधी जाहीर करण्यासारखे झाले. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार उमेदवार निकाल जाहीर करू शकत नाही, असा आरोप अर्जातून केला आहे. 


"मी पुन्हा येईन' विरोधात नागपूर उच्च न्यायालयात अर्ज 
याशिवाय, दक्षिण-पश्‍चिम विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फडणवीस यांचा नामांकन अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारला आहे. फडणवीस यांना अवैध पद्धतीने मदत पोहोचविल्याचा आरोपदेखील ऍड. उके यांनी याचिकेतून केला आहे. यावर वकालतनामा दाखल करण्यासाठी सहा आठवड्यांची वेळ देण्याची विनंती फडणवीस यांच्यातर्फे बाजू मांडताना ऍड. उदय डबले यांनी न्यायालयाला केली. ही विनंती मान्य करीत उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 1 एप्रिल रोजी ठेवली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या समक्ष सुनावणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT