Central Highway Sakal
विदर्भ

केंद्रीय महामार्गाच्या बांधकामात तफावत

केंद्रीय महामार्गाच्या रस्ता बांधकामानंतर दोन्ही बाजूला अचलपूर तालुक्यातील परसापूर येथे नालीचे बांधकाम सुरू आहे.

आनंद चिठोरे

केंद्रीय महामार्गाच्या रस्ता बांधकामानंतर दोन्ही बाजूला अचलपूर तालुक्यातील परसापूर येथे नालीचे बांधकाम सुरू आहे.

पथ्रोट (जि. अमरावती) - केंद्रीय महामार्गाच्या (Central Highway) रस्ता बांधकामानंतर (Construction) दोन्ही बाजूला अचलपूर तालुक्यातील परसापूर येथे नालीचे बांधकाम सुरू आहे. ही नाली रस्त्याच्या मध्यबिंदूपासून कुठे साडेपाच, कुठे सहा, तर कुठे सहा मीटर लांबीवर बांधण्यात आली आहे. या कामाच्या मापात तफावत (Difference) असल्याने भविष्यात नवा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्य महामार्ग क्रमांक 24 चे केंद्रीय महामार्ग क्रमांक 548 सी मध्ये रूपांतर झाल्यावर मध्य प्रदेशच्या सीमेपासून ते अकोटपर्यंत शंभर किलोमीटरचा फोरलाइन सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर गाववस्ती असणाऱ्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला संबंधित बांधकाम कंपनीकडून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत परसापूर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम सुरू आहे.

ही नाली रस्त्याच्या मध्यबिंदूपासून कुठे साडेपाच, कुठे सहा तर कुठे साडेसहा मीटर लांबीवर बांधण्यात आली आहे. या सर्व आखण्या कुणाच्या तरी फायद्यासाठी केल्या गेल्याचा संशय व्यक्त करून सर्वांना एका चौकटीत न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय नालीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. नालीतून पाणी वाहनाकरिता काढलेल्या उतारात तफावत आहे.

नवीन नालीचे बांधकाम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या व जीर्ण नाल्यांचा परस्पर वापर या बांधकामात केला आहे. त्या नाल्यांचे माप रोडपासून सतरा फुटांच्या आता आहे तर नवीन नाल्यांचे माप वीस ते तेवीस फुटांपर्यंत घेण्यात आले आहे. तेव्हा एकच माप न लावता भेदभाव केला आहे. कुणाचे हेतुपुरस्सर नुकसान न करता संबंधित नियमबाह्य कामांची चौकशी व त्यांनी ठरवलेल्या मोजमापाची पुनर्रतपासणी करण्याची मागणी परसापूर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.

रस्त्याचे बांधकाम करताना 25 मीटरची हद्द कायम केली होती. ती जुन्या रस्त्याच्या हिशोबाने केली होती. नवीन रस्ता तयार करताना जे कट व टर्नमध्ये बदल झाले, त्या हिशोबाने त्याला आकार देण्यात आला. शेवटी ते काम 25 मीटरच्या आतच आहे. टर्निंगच्या हिशोबाने ते कमी जास्त झाले बाकी काही नाही.

- तिलकराज वासनकर, शाखा अभियंता राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT