Disaster escapes by throwing sick old man on the road amravati news 
विदर्भ

आजारी वृद्धेस रस्त्यात टाकून आप्तांचे पलायन; प्रकृती गंभीर होऊ लागल्याने सोडले वाऱ्यावर

कृष्णा लोखंडे

अमरावती : परप्रांतातून आलेल्या आजारी महिलेस रस्त्यावर सोडून आप्ताने पळ काढल्याने असहाय झालेल्या महिलेस मनपाचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी मदतीचा हात देत माणुसकीचा परिचय दिला. आता या आजारी वृद्धेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तिला नंतर मनपाच्या बडनेरा येथील आधार केंद्रात हलविण्यात येणार आहे.

गुजरातमधून ही वृद्ध महिला आप्ताबरोबर अमरावतीत आली. ती आजारी असल्याने व प्रकृती गंभीर होऊ लागल्याने आप्ताने तिला रस्त्यात सोडून पळ काढला. रस्त्याच्या कडेला ती विव्हळत पडून असताना उर्मी शाह यांना दिसली. त्यांनी बबलू शेखावत यांना यासंदर्भात कळवून काही व्यवस्था करता येऊ शकेल का? अशी विचारणा केली.

शेखावत यांनी तत्काळ सर्व संबंधित आरोग्य यंत्रणांसोबत संपर्क साधला. मात्र, त्यांना चांगला अनुभव आला नाही. अखेर मनपाच्या बडनेरा येथील आधार केंद्राचाच आधार घ्यावा, अशा विचाराने त्यांनी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्याशी संपर्क साधला. नरेंद्र वानखडे यांनी आधार केंद्राची चमू तातडीने तिथे पाठविली. मात्र, वृद्ध महिलेस आधी उपचाराची गरज असल्याने तिला रुग्णालयात नेण्याचे ठरले.

बबलू शेखावत यांना आरोग्ययंत्रणेचा आलेला पूर्वानुभव लक्षात घेत त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून व्यवस्था करण्याची सूचना केली. येथे मात्र प्रतिसाद मिळाला. तातडीने व्यवस्था झाली. या महिलेवर उपचार सुरू झाले आहेत. यानंतर तिला बडनेरा येथील महापालिकेच्या आधारकेंद्रात हलविण्यात येणार आहे. या केंद्राचे व्यवस्थापक राजू बसवनाथे, ज्योती राठोड व कर्मचाऱ्यांनी या कामात महत्त्वाची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

Vilas Ghule Case : सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याआधी बीडमध्ये खळबळ;विलास घुले यांच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Blistering Heat : शहरी भागांत उष्णतेच्या झळा तीव्र; ३४ वर्षांत ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT