dispute between mahavikas aghadi and bjp over wardha corporation building inauguration  
विदर्भ

सत्ता आमची, लोकार्पण आम्हीच करू; पालिका इमारतीच्या उद्घटनावरून महाविकास आघाडी अन् भाजप आमनसामने

रूपेश खैरी

वर्धा : नगरपालिकेची हक्‍काची इमारत पाडल्याने पाण्याच्या टाकीखाली तात्पुरते बांधकाम करून कामकाज सुरू केले. येथे आता नवी इमारत निर्माण झाली. ही इमारत वापरात येण्यापूर्वीच लोकार्पणावरून वादाची ठरू पाहत आहे. नवी इमारत पूर्ण झाल्याने पालिकेत सत्ता असलेल्या भाजपने लोकार्पणाची तयारी सुरू केली, तर शिवसेनेने पालकमंत्र्यांना निवेदन देत महाविकास आघाडीची सत्ता असल्याने लोकार्पण अधिकार मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे लोकार्पणावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने उभी ठाकली आहे. 

वर्धा नगरपालिका इमारतीच्या कारणावरून नेहमीच वादात राहिली आहे. पूर्वी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोर असलेली जुनी ऐतिहासिक इमारत पाडून नवीन बांधण्याचा मानस होता. ही इमारत पाडताच येथे पुन्हा वाद उफाळला. शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी शेखर शेंडे आणि तत्कालीन नगराध्यक्ष सुनीता इथापे यांच्या वाद झाला. हा वाद पोलिसातून न्यायालयात पोहोचला. त्या काळापासून ही जागा पडीक आहे. हा वाद सुरू असतानाच पालिकेने कारागृह मार्गावरील पालिकेच्या मालकीच्या पाण्याच्या टाकीखाली तात्पुरती व्यवस्था करून कामकाज सुरू केले. या टाकीने सुमारे सहा नगराध्यक्ष पाहिले. यानंतर पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. त्यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी तत्कालीन पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पालिकेच्या नव्या इमारतीची मागणी केली. याचा सतत पाठपुरावा केल्यानंतर इमारत मंजूर झाली. या इमारतीचे बांधकाम झाले. आता ती लोकार्पणासाठी सज्ज झाली. पालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांनी लोकार्पणाची तयारी सुरू केली. सर्वत्र पत्रव्यवहार झाला. राज्यात सत्ता महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या इमारतीच्या लोकार्पणाचा अधिकार मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना असल्याचा मुद्दा चर्चेत आला. यामुळे वर्ध्यातही एकाच कामाचे दोन भूमिपूजन होण्याची प्रथा सुरू होते की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आर्वीनंतर वर्धा तर नाही ना? - 
एका विकास कामाचे दोन वेळा भूमिपूजन करण्याची प्रथा आर्वी तालुक्‍यात आहे. येथे सत्ताधारी आणि विरोधक भूमिपूजनासाठी एकमेकांवर वारंवार कुरघोडी करीत असतात. आता वर्ध्यातही एका इमारतीच्या लोकार्पणावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आल्याने तसा प्रकार येथे तर होणार नाही ना? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

भाजपने पाठविले सर्वांना पत्र - 
पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने या लोकार्पणासंदर्भात सर्वांनाच पत्र पाठविले आहे. यामुळे येथे आम्हीच असा मुद्दा येत नसल्याचे वर्धा पालिकेत सत्तेत असलेल्यांकडून सांगण्यात आले आहे. विकास कामे सर्वांच्या सहकार्यातून होत असल्याने कोणालाही बंधन नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

लोकार्पणासाठी सर्वांनाच पत्र पाठविण्यात आले आहे. यामुळे लोकार्पण फक्‍त भाजप किंवा महाविकास आघाडी करेल असा मुद्दा नाही. तरीही असा मुद्दा आला तर चर्चा करू. 
- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे जिल्ह्यातील इमारतीचे लोकार्पण करण्याचा अधिकारी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचा आहे. यामुळे लोकार्पण त्यांनीच करावे अशी मागणी पालकमंत्र्यांना निवेदनातून केली आहे. 
- आनंद मंशानी, अध्यक्ष, वर्धा शहर शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway: पश्चिम रेल्वेकडून गुडन्यूज! दिवाळी-छठपूजेसाठी विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक

PMC Bonus Scam : सुरक्षा रक्षकांना ना बोनस ना वेतन, ऐन दिवाळीत कर्मचारी हवालदिल; ठेकेदार महापालिकेला देईना दाद

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाच्याही प्रवासावर कोणतेही बंधन नाही - राम कदम

Dhaka Airport Fire Video : ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग ; सर्व विमानांचे लँडिंग अन् टेकऑफ तातडीने थांबवले गेले!

New Year Horoscope Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी ! 2026 मध्ये 'या' 5 राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT