crime (2).jpg 
विदर्भ

थरारक : शेतीचा वाद गेला विकोपाला अन् दोन सख्ख्या भावांचाच काढला काटा

सकाळ वृत्तसेवा

मोताळा/धामणगाव बढे (जि.बुलडाणा) : शेतीच्या वादातून दोघा सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची घटना शुक्रवारी (ता.12) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सिंदखेड लपाली येथे घडली. या वादात काही जण जखमी झाले आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे तालुकाभरात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील सिंदखेड लपाली येथील मोरे कुटुंबीयांत शेतीच्या कारणावरून भाऊबंदकीत वाद झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी त्यांच्यात शेतात बोलचाल झाली. त्यानंतर सायंकाळी गावात पुन्हा त्यांच्यातील वाद उफाळून आला. यावेळी गजानन मोरे, उमेश गजानन मोरे, मंगेश गजानन मोरे तसेच सुभाष रामलाल मोरे, त्र्यंबक रामलाल मोरे, सुनील सुभाष मोरे, अनिल मोरे व सहकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. 

या हाणामारीत सुभाष रामलाल मोरे (वय 53), त्र्यंबक रामलाल मोरे (वय 55) या दोघा सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. तर, काही जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच धामणगाव बढेचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर, पीएसआय योगेश जाधव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुनील मोरे व अनिल मोरे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतक सुभाष मोरे आणि त्र्यंबक मोरे हे दोघे सख्खे भाऊ असून, गजानन मोरे हा त्यांचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. 

भाऊबंदकीतील या वादात दोघांचा निर्घृण खून झाल्याची थरारक घटना घडली आहे. दरम्यान, बुलडाणा येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, डीवायएसपी रमेश बरकते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुहेरी हत्याकांडामुळे सिंदखेड गावात एकाच हलकल्लोळ झाला असून, तालुकाभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, वृत्त लिहिपर्यंत धामणगाव बढे पोलिसांची कार्यवाही सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT