election sakal
विदर्भ

अमरावती : जिल्हा बँक निवडणुकीचा बिगुल; हायकोर्टाने स्थगिती उठविली

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्र ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. संचालक मंडळाच्या संख्येबाबत एका संचालकाच्या याचिकेवरून न्यायालयाने निवडणुकीला स्थगनादेश दिला होता. मात्र, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही स्थगिती उठवली.

जिल्हा बँकेची मुदत संपल्यानंतर सहकार विभागाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ३१ ऑगस्टपासून नामांकनाची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. मात्र, बँकेचे एक संचालक नितीन हिवसे यांनी संचालक संचालकांच्या संख्येच्या मुद्यावर न्यायालयात धाव घेत स्थगनादेश मिळविला.

त्याला बँकेचे अन्य एक संचालक अभिजित ढेपे यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी करताना न्यायालयाने हा स्थगनादेश उठविल्याची माहिती ढेपे यांचे वकील ॲड. पराग कडू यांनी दिली. त्यामुळे मंगळवारपासून पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नामांकनाची प्रक्रिया सुरू होऊन चार ऑक्टोबरला मतदान, तर पाचला मतमोजणी घेतली जाईल.

असा होता वाद

केंद्र सरकारने २०१३ च्या उपविधीनुसार सहकार संस्थेत २१ पेक्षा अधिक संचालक असू शकत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेतील संचालक संख्या २३ वरून २१ झाली. या बदलानुसार निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र, मतदारसंघाची संख्या कमी करणे, हे बेकायदेशीर असल्याची भूमिका घेऊन एक संचालक नितीन हिवसे यांनी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाकडून स्थगनादेश मिळविला होता. सोमवारी उच्च न्यायालयाने हा स्थगनादेश उठविला.

निवडणूक वेळापत्रक

  • उमेदवारी अर्ज दाखल करणे : ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर

  • प्राप्त उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध : ६ सप्टेंबर

  • उमेदवारी अर्जांची छाननी : ७ सप्टेंबर, दुपारी १२ पासून.

  • वैध अर्जांची यादी प्रसिद्धी : ८ सप्टेंबर, दुपारी १२ वा.

  • नामांकन मागे घेणे : ८ ते २२ सप्टेंबर

  • चिन्हवाटप व अंतिम यादी जाहीर : २३ सप्टेंबर

  • मतदान : ४ ऑक्टोबर

  • मतमोजणी व निकाल जाहीर : ५ ऑक्टोबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT