images
images 
विदर्भ

‘कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावरच शाळा सुरू करा’

सकाळ वृत्तसेवा

gon01p03
गोंदिया ः निवेदन देताना जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी.

 
गोंदिया : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील सर्वच व्यवस्थापनाच्या शाळांचे नवीन  शैक्षणिक सत्र १ जुलैपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे आदेश सरकारने मागे घ्यावे.  कोरोना काळातील संसर्गाची परिस्थिती बघता, कोरोनाचा प्रादुर्भाव टळल्यानंतरच शाळा सुरू  करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली. याबाबतचे निवेदन  जिल्हाधिकारीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याकडे पाठविले.
 
महाराष्ट्र शासनाने सोमवारी (ता. १५) शासन परिपत्रक निर्गमित करून सर्व शाळांना शाळा  सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अंमलबजावणीस्तव  संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. परंतु, हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरणार  तर नाही ना. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शाळा प्रशासन संभ्रमात  आहेत. 

त्यातच पुन्हा सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविले आहे. केंद्र सरकारनेही शाळा,  महाविद्यालये सुरू करण्यावर बंदी घातलेली असताना राज्यातील शिक्षण विभागाने मात्र  शाळा सुरू करण्याचे दिलेले निर्देश हे, विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण  करणारे ठरणार आहे.

त्यामुळे, लॉकडाउन काळ संपल्यानंतर व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव  संपल्यानंतरच शाळेचे वर्ग प्रारंभ करावे. अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने  मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याकडे केली आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने अध्ययन-अध्यापन ही  संकल्पना ज्या विद्यार्थ्यांकडे ऍनड्राईड मोबाईल नाहीत. अशा विद्यार्थ्यांवर अन्याय  करणारी आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या ८५ टक्‍के आहे.

विषम परिस्थितीत शाळेचे वर्ग सुरू करण्याचा निर्णयही गैरसोयीचा होणार आहे. असे,  निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य  रामसागर धावडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश तणवानी, कार्यवाह  मुख्याध्यापक बी. डब्ल्यू. कटरे, उपाध्यक्ष प्राचार्य सी. जी. पाऊलझगडे, जिल्हा मार्गदर्शक  प्राचार्य खुशाल कटरे, जिल्हा महिला प्रतिनिधी मुख्याध्यापिका अजया चुटे, जिल्हा  शैक्षणिक उपक्रमप्रमुख प्राचार्य भगीरथ जिवानी, तालुकाध्यक्ष प्राचार्य बी. पी. बिसेन  उपस्थित होते.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT