doctor Gugulwar and his wife corona positive even after second dose in Gadchiroli  
विदर्भ

लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतरही आदिवासींसाठी झटणारे गोगुलवार दाम्पत्य पॉझिटिव्ह

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली : कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतरही ज्येष्ठ समाजसेवक तथा आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सध्या दोघेही येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचार घेत आहेत.

डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागांतील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही संस्था स्थापन करून कार्य करीत आहेत. त्यांचे निवासस्थान व कार्यालय कुरखेडा येथे आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता त्यांनी आधीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. 

फेब्रुवारी महिन्यातच त्यांचे या लसीचे दोन्ही डोज पूर्ण झाले होते. तरीही त्यांना कोरोनाने गाठले. बुधवारी (ता. ७) डॉ. गोगुलवार व शुभदा देशमुख यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल गुरुवारी (ता. ८) सायंकाळी प्राप्त झाला. अहवालात दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे नमूद होते. त्यानंतर गुरुवारी रात्रीच त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील कोरोना कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धोका कमी होतो 

यासंदर्भात डॉ. सतीश गोगुलवार यांच्याशी संपर्क साधला असता कोरोना संसर्ग झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोघांचीही प्रकृती बरी आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, याची खात्री नाही. मात्र, ही लस घेतल्यावर कोरोना झाल्यावरही या आजारातून लवकर बरे होण्यास मदत मिळते. कोरोनाचा धोका कमी होतो, असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

Teacher Salary: ई-केवायसीशिवाय ऑगस्टचे वेतन नाही; शिक्षण संचालकांचा कडक आदेश, मुदतवाढीला स्पष्ट नकार

नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू, एकाचा झुडुपामुळे वाचला जीव; मृतांमध्ये ५ ते ११ वर्षीय मुले

शंभर लोकांना घेऊन अरविंद केजरीवाल पंतप्रधानांच्या घरावर जाणार; 'आप'ने उचलला नवीनच मुद्दा, अडीच लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन

SCROLL FOR NEXT