File photo
File photo 
विदर्भ

पुसद उपजिल्हा रुग्णालयात डॉक्‍टर गायब

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील कारभार ढेपाळला असून, कर्तव्यावर असलेले डॉक्‍टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना ताटकळत राहावे लागते. या प्रकाराने आरोग्यसेवेची ऐशीतैशी होत असून, आरोग्य संचालकांनी लक्ष घालावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
तालुक्‍यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय आवश्‍यक सर्व सुविधांनी परिपूर्ण असल्याच्या गप्पा मारण्यात येतात. प्रत्यक्षात उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. बाह्यरुग्ण कक्षात तपासणीसाठी डॉक्‍टरांची नेमणूक करताना डॉक्‍टर्स वेळेवर येत नाहीत. त्यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. मंगळवारी (ता.20) उपजिल्हा रुग्णालयात फेरफटका मारला असता, बाह्यरुग्ण विभागासमोर रुग्णांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसल्या. दुपारच्या ड्यूटीवर डॉक्‍टर साडेचार वाजेपर्यंत आले नसल्याने रुग्ण त्रस्त झालेले होते. उशिरा डॉक्‍टर आल्यानंतर पाच वाजता दवाखाना बंद करण्यात येतो. त्यामुळे रुग्णांना विनाकारण हेलपाटे घ्यावे लागतात. बाह्यरुग्ण विभागाच्या बाजूला असलेल्या तपासणी कक्षात कोणी डॉक्‍टर नव्हते.
त्यामुळे आम्ही कुणाला तब्येत दाखवावी, असा प्रश्न रुग्णांनी केला. उपजिल्हा रुग्णालयातील हा प्रकार नेहमीचाच असून, वैद्यकीय अधीक्षकांची याकडे कुठलेही लक्ष नसल्याची तक्रार रुग्णांनी केली.
खासगी रुग्णालयात भरमसाठ पैसे उकळण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील व गोरगरीब रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. शासनातर्फे आरोग्यसेवा पुरविण्यासाठी यंत्रणा नियुक्त करण्यात आलेली आहे. परंतु, ही यंत्रणाच आपले कर्तव्य पार पाडत नसल्याने आरोग्य विभागात अनागोंदी निर्माण झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात वेळेत व योग्य उपचार होत नसल्याने या रुग्णालयाचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT