doctor raised awareness of the corona virus through song at Wardha  
विदर्भ

CoronaVirus : 'बात पतेकी एक बताऊ...' डॉक्‍टरांनी तयार केली ध्वनीफित, देते ही माहिती...

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : सध्या देशात कोरोना व्हायरसचीच चर्चा आहे. अनेकांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला. कोरोनापासून बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले जात आहे. संसर्गजन्य मानल्या जाणाऱ्या या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच उपाययोजना सांगण्यासाठी वर्धेतील डॉक्‍टरने कोरोना व्हायरस जनजागृती ध्वनीफित व लघुचित्रफीत तयार केली आहे. याची वर्धेत चर्चा आहे. प्रशांत वाडीभस्मे असे डॉक्‍टरचे नाव आहे... 

वर्धेत कोरोना आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, कोरोनाचा झपाट्याने होणाऱ्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच वैद्यकीय जनजागृती मंचने पुढाकार घेतला आहे. मंचचे सदस्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सालईकला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी स्वरचित व स्वतः गायलेले कोरोना आजारावरील संपूर्ण माहिती देणारे हिंदी भाषेतील "बात पतेकी' हे लघुचित्रफित व ध्वनीफित तयार केले आहे.

डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी यापूर्वी स्वाईन फ्लू, कुष्ठरोग, क्षयरोग, डेंगी, जलबचत आदी विषयांवर जनजागृती गीत व पोवाडे लिहिलेले आहेत. त्यांचे "डोस्क फिरले आता या पाण्यासाठी' हे गीत पाणी फाउंडेशनने अख्या महाराष्ट्रात गाजविले आहे. कोरोना व्हायरस जनजागृतीपर गीत व प्रतिबंधात्मक जनजागृती रेडिओ एमगिरी या सामूदायिक रेडिओ केंद्राच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे रेडिओ एमगिरीचे केंद्र समन्वयक अमोल देशमुख यांनी सांगितले. 

विविध माध्यमातून माहिती

वैद्यकीय जनजागृती मंचमार्फत वर्धा शहरात तसेच गावांमध्ये कोरोना आजाराची लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे होर्डिंग व वर्तमानपत्रात हॅंडबिल मार्फत जनजागृती करण्यात येत असल्याचे मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी सांगितले. डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सामान्य रुग्णालयात कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी विलगीकरण कक्ष तयार केल्याची माहिती दिली. 

गीत हिंदी भाषेतून

"बात पतेकी एक बताऊ...' या ओळींपासून हे गाण सुरू होते. हे गीत डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनीच गायल असून, प्रवीण चवरे यांनी संगीत दिले आहे. वैद्यकीय जनजागृती मंचाने गाण प्रोड्यूस केल आहे. लोकांना सहज या आजाराची माहिती मिळावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्या, याची माहिती होण्यासाठी हिंदी भाषेतून हे गीत तयार केले आहे. 

जनजागृतीचा निर्णय स्वागतार्ह

बऱ्याच गोष्टी पुस्तक स्वरुपात लक्षात राहत नाहीत. अशावेळी गाण्याच्या तालावर एखाद गीत तयार केल्यास त्याचा परिणाम अधिक दिसतो. गाण्यातून जनजागृती लवकर होण्यास मदत मिळते. या गाण्यातून आजाराच्या लक्षणांची माहिती देण्यात आली आहे. सोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचीही माहिती दिली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर गाण्यातून जनजागृतीचा निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह मानले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT