file photo 
विदर्भ

डॉक्‍टर्सना सहा महिन्यांपासून मानधन नाही

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : महापालिकेच्या शहरी आरोग्यकेंद्रात "डॉक्‍टर इंचार्ज' या पदावर कार्यरत डॉक्‍टर्सना सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. बाह्य खासगी संस्थेमार्फत मनपाने या डॉक्‍टर्सची सेवा घेतली. मात्र संबंधित संस्थेने मानधन न दिल्याने या डॉक्‍टर्सनी मानधनासाठी आयुक्तांकडे तक्रार केली असून मनपाच्या अस्थाई सेवेत समावेश करावा, अशी विनवणी केली आहे.
डॉ. जयदीप देशमुख (नमूना व भूतेश्‍वर शहरी केंद्र), डॉ. मीनाक्षी मेंढे (भाजीबाजार केंद्र), डॉ. छाया थोरात (आदिवासी व पाचबंगला केंद्र), डॉ. शारदा टेकाडे (आयसोलेयसशन व वनिता समाज) या शहरी आरोग्यकेंद्रात गेल्या सहा महिन्यांपासून सेवा देत आहेत. या चारही डॉक्‍टर्सची नियुक्ती महापालिकेने बाह्य खासगी स्वस्तिक बेरोजगारांची स्वयंरोजगार नागरी सेवा सहकारी संस्थेमार्फत केली आहे. तुटपुंज्या मानधनावर हे चारही डॉक्‍टर्स या दवाखान्यातून आरोग्यसेवा देत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना संस्थेने मानधन दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात नैराश्‍य निर्माण झाले असून कामातील उत्साह मावळला आहे. खासगी संस्था मानधन देत नसल्याने व सेवा करायची असल्याने त्यांनी महापालिकेत अस्थाई म्हणून नियुक्ती देण्याची विनंती केली, जेणेकरून नियमित किमान मानधन तरी मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'माझ्या घरात तिला ठेवायला जागा नाही'..आईला वृद्धाश्रमात सोडणारी निर्दयी मुलगी; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल

Stomach Noises: आपल्या पोटातून गुरगुरणारा आवाज का येतो? डॉक्टरांनी सांगितली यामागची खरी कारणं

Latest Maharashtra News Updates : गुजरातहून माणसं आणून आपल्यावर नजर ठेवली जात आहे- उद्धव ठाकरे

Santosh Dhuri: आमचं रक्त भगवं, पण पक्ष हिरव्यांसमोर झुकला, मनसेचा ताबा चुकीच्या हातात गेल्याचं म्हणत संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : तळोद्यात मध्यरात्री भिंत कोसळली, दोन जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT