file photo
file photo 
विदर्भ

धंतोलीत कुख्यात गुंडाचा खून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वस्तीतील दादागिरीला कंटाळलेल्या मामा-भाच्याने एका कुख्यात गुंडाचा भरचौकात दगड-विटांनी ठेचून खून केला. या घटनेने धंतोली परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. नितीन विनायक कुळमेथे (45, रा. तकिया धंतोली) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. तर मंगेश मधुकर सोनवणे (47) आणि पंकज ऊर्फ कुणाल सचिन राऊत (20) दोन्ही रा. तकिया धंतोली यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कुळमेथे हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर 1994 ते 2009 या दरम्यान शहरातील नंदनवन, पाचपावली, कोतवाली आणि धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी शासनाच्या आरोग्य विभागात नर्स आहे. ती सध्या पंढरपूर येथे कर्तव्यावर आहे. काही वर्षांपासून नितीन हा पत्नीसोबत पंढरपूर येथे राहत होता. त्याच्याविरुद्ध शहरातील न्यायालयात अनेक खटले सुरू असून नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यात न्यायालयात हजर न झाल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाला असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी तो शहरात दाखल झाला. तेव्हापासून तो तकिया धंतोलीत राहायचा. वस्तीत राहणारा मंगेश हा पोलिसांच्या खबऱ्या असल्याचा नितीनला संशय होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सोमवारी दुपारी 3.30 च्या सुमारास नितीन हा मद्यधुंद अवस्थेत मंगेशच्या घरासमोर पोहोचला व त्याला शिवीगाळ करू लागला. तो घराबाहेर निघाला व त्याने शिवीगाळ करण्यास मनाई केली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व धक्काबुक्की झाली. यावेळी मंगेशने आपला भाचा पंकज याला बोलावून घेतले व दोघांनीही मिळून त्यांनी त्याच्या डोक्‍यावर काठीने वार केले. त्यानंतर विटांनी डोके ठेचले. माहिती मिळताच धंतोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद सनस हे इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT