Don't believe the rumors, there is no food shortage in the Amravati region 
विदर्भ

अफवांवर विश्वास ठेवू नका, अमरावती विभागात अन्नधान्याची टंचाई नाही

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती विभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करण्यात येणाऱ्या तसेच खुल्या बाजारात अन्नधान्याची कोणतीही टंचाई नाही. राज्यातील कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना अन्नधान्य मिळण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

6 एप्रिलपर्यंत 40 हजार 916 मेट्रिक धान्य स्वस्त धान्य दुकानांपर्यंत वितरित करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना गहू तसेच तांदूळ पुरविण्यात येत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झालेला नाही.

अन्न योजनेतून 40 हजार मेट्रिक टन धान्याचे वितरण

विभागात अंत्योदय अन्न योजनेतून आतापर्यंत 9 हजार 664 मेट्रिक टन तर प्राधान्य गट योजनेतून 31 हजार 252 मेट्रिक टन अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट योजनेतून 9 हजार 606 मेट्रिक टन, अकोला जिल्ह्यात 6 हजार 637, वाशीम जिल्ह्यात 5 हजार 288, यवतमाळ जिल्ह्यात 9 हजार 645, बुलडाणा जिल्ह्यात 9 हजार 740 मेट्रिक टन गहू आणि तांदूळ वितरित करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT