विदर्भ

‘म्युकरमायकोसिस’ची अनावश्‍यक भीती; डॉ. दरणे यांनी मांडले मत

सूरज पाटील

यवतमाळ : म्युकरमायकोसिस (Mucor mycosis) हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार नवीन नसून अनेक रुग्णांमध्ये त्वचा, नाक, डोळ्यांच्या बाजूचा भाग तसेच शरीरातील इतर भागांमध्ये हा आजार होऊ शकतो. त्याचे प्रमाण हे अतिशय कमी होते. त्यावर उपचार केले जाऊ शकतात. कोविडच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेत या आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. वेळीच दक्षता घेतल्यास आजार बरा होतो. मात्र, समाजात अनेक ठिकाणी गैरसमज पसरल्याने अनावश्‍यक भीती तयार होत आहे, असे मत प्रसिद्घ दंतरोगतज्ज्ञ डॉ. चेतन दरणे (Dr. chetan darne) यांनी दै. ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केले. (Unnecessary fear of mucomycosis in citizens)

आजार कसा होतो?, त्याची लक्षणे काय?, त्यावर कशाप्रकारे उपचार केले जाऊ शकतात. महाराष्ट्र शासनाचा याविषयीचा दृष्टिकोन काय व होऊ नये, म्हणून काय करता येऊ शकते, आदींबाबत डॉ. दरणे यांनी विचार व्यक्त केले. म्युकरमायकोसिस हा एक काळी बुरशीमुळे होणारा आजार आहे. कुजलेली बुरशी ही सहसा नाकावाटे किंवा हातावाटे वरील भागात जाऊन तेथे आजार तयार करू शकते.

या आजारांमध्ये डोके दुखणे, ताप येणे, जबड्यावर काळे चट्टे पडणे, गालावर व डोळ्याखाली काळे चट्टे पडणे हे काही लक्षणे दिसून पडतात. एकाएकी दात हलणे, हिरड्यांवर व जबड्यांवर सूज येणे, तोंडाची दुर्गंधी येणे. नाकातून काळा स्राव वाहणे, नाकाच्या आत सूज आल्यासारखे वाटणे व नेजल सायनस किंवा मॅक्‍सिलरी सायनस येथे जड वाटणे हीदेखील लक्षणे आहेत.

आजारासाठी डॉक्‍टर रक्ताच्या चाचण्या, सीटी पीएनएस म्हणजेच सिटी स्कॅन सांगतात. या सिटीस्कॅनमध्ये त्वचेची वाढलेली जाडी, हाडांमध्ये होत असलेले बदल, सायनसमध्ये जमा झालेले द्रव, हाडाचा कोणता तुकडा कुजला आहे काय, या सर्वांचा सखोल अभ्यास करतात. सोबतच डीप नेजल स्वॅब घेऊन त्यात बुरशीचे प्रकार कोणते हे ठरवले जाते. सोबतच सी-रिऍक्‍टिव प्रोट्रीन टेस्ट व आजारी असलेल्या भागाचा मासाचा तुकडा घेऊन बायोप्सी केली जाते.

हा आजार होऊ नये म्हणून कोरोना झालेल्या व भरती असलेल्या रुग्णांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. या आजारात सर्जिकल व मेडिसीनल व्यवस्थापन हे दोन महत्त्वपूर्ण भाग आहेत. राज्यातील नागरिकांना सुविधा मिळावी, औषधासाठी हाल टाळण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिसवर उपचार केला जातो, ही दिलासा देणारी बाब आहे.

काय काळजी घेणे आवश्‍यक

रुग्णाच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असावे, ओटू ऑक्‍सिजन ज्या नळ्यामार्फत दिला जातो. त्यांची स्वच्छता करावी, डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार बुरशीविरोधी क्रिमचा वापर करावा, रुग्णालयातून सुटी घेऊन घरी आल्यावर मौखिक स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही डॉ. दरणे यांनी केले आहे.

(Unnecessary fear of mucomycosis in citizens)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT