सालेकसा : पडक्‍या घराशेजारी उपस्थित नंदलाल परसमोडे. 
विदर्भ

ऊन, वारा, पावसातही त्यांचा संसार जीर्ण घरातच...घरकुल लाभार्थ्याचे स्वप्न अधुरे

सकाळ वृत्तसेवा

सालेकसा (जि. गोंदिया) : वर्षभरापूर्वी घरकुलासाठी अर्ज केले. नवीन घराचे स्वप्न रंगविले. मात्र, हे स्वप्नच अधुरे राहिले आहे. आमगाव खुर्द येथील नंदलाल परसमोडे यांची ही व्यथा आहे. अर्ज करूनही घरकुल मिळाले नसल्याने पडक्‍या जीर्ण घरातच त्यांचे वास्तव्य सुरू आहे. ऊन, वारा, पावसाचा त्यांना सामना करावा लागत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये मोडत असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवसाय आणि आस्थापनांना परवानगी देण्यात आली. मात्र शासकीय कर्मचारी कोरोनामुळे काम उशिरा होत असल्याचे सांगत आहेत.

प्लॅस्टिक, ताडपत्रीने झाकले घर

सालेकसा नगरपंचायतीमध्येसुद्धा सध्या अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. आमगावखुर्द येथील रहिवासी नंदलाल परसमोडे यांनी घरकुलाकरिता अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाला वर्षपूर्ती होत असून अद्याप त्यांच्या अर्जावर काहीही कार्यवाही झाली नाही. सध्या त्यांचे घर मोडकळीस आले आहे. ताडपत्री, प्लॅस्टिक अंथरूण त्यांनी घर कसेबसे बांधून ठेवले आहे. महिनाभरात पावसाळ्याला सुरुवात होणार असताना मात्र परसमोडे यांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसाळ्याच्या आधी घराचे काम पूर्ण न झाल्यास त्यांना उघड्यावर संसार थाटावा लागणार आहे.

घरकुलाची फाईल गेली कुठे?

विशेष म्हणजे, नंदलाल परसमोडे यांच्या मागून अर्ज करणाऱ्यांचे घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नंदलाल यांना "तारीख पे तारीख' मिळत असून त्यांचा घरकुलाची फाईल कुठे गहाळ झाली, हे नगरपंचायतीलाच ठाऊक. पावसामुळे घर नुकसानग्रस्त होऊ शकते, त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी घरकुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी लाभार्थी नंदलाल परसमोडे यांनी केली आहे.

गरजू लाभार्थी वंचित
आपल्या निकटवर्तीय लोकांचे घरकुलाचे काम आधी करण्याच्या नादात अत्यंत गरजू लाभार्थी वंचित ठेवण्याचे काम नगरपंचायत करीत आहे.
- ब्रजभूषण बैस, तालुकाध्यक्ष, मनसे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT