{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613475198160,"A":[{"A?":"I","A":27.704084095095503,"B":766.3596429494456,"D":169.64035705055426,"C":52.59183180980899,"a":{"B":{"A":{"A":"MAEV6fUobl0","B":1}," 
विदर्भ

मन सुन्न! कोळसा खाणीत घडला मोठा अनर्थ; चालकाचा डंपरखाली दबून मृत्यू   

श्रीकृष्ण गोरे

राजुरा (चंद्रपूर) : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती कोळसा खाणीत आज सकाळच्या पाळीत कोळसा स्टाक मध्ये डंपर पलटी होऊन एका ऑपरेटर चा मृत्यु झाला ही घटना सकाळी १०:३० च्या दरम्यान घडली आहे.

डंपर चालक बल्लारपूर येथिल अक्षय भगवान खरतड (वय 51 वर्ष ) सकाळी कोल बेच मधून गाडी न. 682 मधून कोळसा भरून 24 नंबरच्या कोळसा स्टाकमध्ये खाली करण्यासाठी गेला असता डंपर कोळसा खाली करण्यासाठी मागे घेत असताना  पलटी झाला. यात अक्षय डंपर मध्ये दाबला गेला. डंपर मधील डिझेल गळतीमुळे डंपरला आग लागली होती. यावेळी निघाणाऱ्या धूराला पाहून परिसरात कार्यरत कामगारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र  तोपर्यंत डंपर आगीच्या विळख्यात आले होते. 

यात डंपर मध्ये अडकलेल्या अक्षयला डंपरच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले व वेकोलीच्या क्षेत्रीय चिकित्सालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले, मात्र तिथे अक्षयला मृत घोषित करण्यात आले.

मृतक अक्षयच्या पत्नीचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता ती चंद्रपुर च्या दवाखान्यात उपचार घेत होती कालच तिला अक्षयने घरी आणले होते व आज हा दुर्दवी अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आठवड्यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी लोडिंग मशीन पीसी नं. 197 च्या सुरक्षा कर्मचाऱ्याला तलवारीचा धाक दाखवून 38 हजार रूपये किमतीचे 500 लिटर डिझेल दरोडेखोरांनी तलवार दाखवून लुटले होते. 

8 फेब्रुवारी रोजी सास्ती खाण येथील ओव्हर बर्डन फॉलमध्ये 5 मजदूर थोडक्यात बचावले होते. याच महिन्यात हा अपघात झाल्याने सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच वेकोली बल्लारपूर परिसराच्या खाणींमध्ये होणारे अपघात रोखण्यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.मृतक अक्षय हा हॉकी, फुटबॉल आणि एथेलेटिक्सचा उत्कृष्ट खेळाडू होता. वेकोली आंतर-प्रादेशिक स्पर्धांमध्ये तो अव्वल राहायचा. त्याचबरोबर तो हॉकीचा सर्वोत्कृष्ट गोलकीपरही होता.

बल्लारपूर क्षेत्रातील खाणींमध्ये कामगारांच्या सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. असे सांगितले जात आहे की सुरक्षेच्या संदर्भात आज दुपारी 12 वाजता उपक्षेत्रीय व्यवस्थापक यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. पण त्याआधी हा मोठा अपघात झाला. सुरक्षा नियमांचा हवाला देत वेकोली अधिकाऱ्यांची पितळ मात्र या घटनेमुळे उघडे पडले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT