गोंदिया : वाळू घाटावर पाहणी करताना अपर जिल्हाधिकारी राजेश खवले.
गोंदिया : वाळू घाटावर पाहणी करताना अपर जिल्हाधिकारी राजेश खवले.  
विदर्भ

सावधान! वाळूघाटांवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर, वाळूचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : वाळूचोरीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ड्रोन कॅमेराच्या वापराला सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे वाळू चोरीला नक्कीच आळा बसेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. नुकतीच अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी या व्यवस्थेची पाहणी केली.

जिल्ह्यातील वाळू घाटांवरून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. ट्रक, ट्रॅक्‍टरने वाळू वाहतूक होत असल्याने रस्त्यांचीदेखील पुरती वाट लागली आहे.

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर वाळू माफियांचे हल्लेदेखील वाढले आहेत. दरम्यान, माफियांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. ड्रोन कॅमेरा त्यांची हालचाल टिपणार आहे.

तथापि, काल गुरुवारी तालुक्‍यातील डांगुरली आणि तेढवा घाटावर वाळू चोरीला आळा घालण्याकरिता ड्रोन कॅमेरा उडविण्यात आला. या कार्यवाहीत एकही वाळू चोरी करणारा ट्रक दिसून आला नाही. ही मोहीम रात्रीच्या वेळीसुद्धा राबविली जाणार आहे. त्यामुळे वाळूचोरीची प्रकरणे नक्कीच उघडकीस येतील, असा प्रशासनाला विश्‍वास आहे.

वाळूचोरीची वाहने सापडल्यास रजिस्ट्रेशन रद्द

ड्रोन कॅमेरामध्ये आढळलेली वाहने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांच्याद्वारे जप्त केली जातील. अशा वाहनांचे रजिस्ट्रेशनदेखील रद्द करण्यात येणार आहेत. तसेच वाळू चोरीच्या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींची ड्रोन शूटिंगच्या आधारे ओळख पटवून त्याआधारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाणार आहे. ड्रोन पाहणी प्रात्यक्षिकामध्ये अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, महसूल सहायक किशोर राठोड व विभागाचे अन्य अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. ड्रोन पाहणीमुळे वाळूचोरी प्रकरणांना आळा बसेल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT