Gharkul 
विदर्भ

वाळू मिळत नसल्याने अनेकांच्या घरकुलांचे स्वप्न अर्धवटच

विनायक रेकलवार

मूल (जि. चंद्रपूर) : पंतप्रधान घरकुल आणि इतर योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुल योजनेला सध्या वाळूचे ग्रहण लागले आहे. वाळू घाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे वाळूची तस्करी जोरात सुरू आहे. त्याचे दर कडाडले आहेत.

वाळू घाटांचे लिलाव न झाल्यामुळे शासकीय योजनेतून मिळणाऱ्या घराच्या बांधकामासाठी वाळू मिळेनासी झाली आहे. वाळू तस्करांकडून बाजारात येणाऱ्या वाळूची किंमत सर्वसाधारण लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे घरबांधकामाचे अंदाजपत्रक आणि वाळूच्या किंमती याचा ताळमेळ जुळत नाही. परिणामी अनेकांनी बांधकामाला सुरवात केली नाही. ज्यांनी केली, त्यांचे बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या घरकुल बांधकामाची रक्कम परत जाण्याची भीती लाभार्थ्यांना आहे. 

शासकीय घरकुल योजनेसाठी स्थानिक प्रशासन लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळूची व्यवस्था करून देतात. परंतु अद्यापपर्यंत वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे मूल तालुक्‍यातील घाटातून वाळूची तस्करी जोरात सुरू आहे. तेथून वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. 

त्यातच मजुरांचे वाढलेले दर, सिमेंट, लोखंड आणि इतर साहित्याचे गगनाला भिडलेले भाव यामुळे बांधकाम वेळेत पूर्ण होत नाही. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधीसोबत अनेकांनी कर्ज घेतले आहे. परंतु घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही, तरीही त्यांना आता कर्जाचे हप्ते फेडावे लागत आहेत. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Pali News : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT