lightning 
विदर्भ

पावसापासून बचावासाठी ते चौघे झाडाखाली थांबले, तेवढ्या आकाशातून पडला आगेचा गोळा...

राजेंद्र मारोटकर

अमरावती / गोंदिया : बुधवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस आला. यावेळी अंगावर वीज पडून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्‍यातील दोन महिलांचा, तर गोंदिया जिल्ह्यातील एका युवकाचा मृत्यू झाला. एक युवती गंभीर जखमी झाली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्‍यात असलेल्या जरुड येथील वॉर्ड क्रमांक चारमध्ये राहत असलेल्या मीरा धर्मराज गायधने (वय 37) व शोभा रमेश खाडे (वय 51) या गावातील इतर महिलांसोबत इसंब्री मार्गावरील जरुड शेतशिवारात असलेल्या हनुमंत दिघेकर यांच्या शेतातील कपाशीच्या पिकात निंदणाच्या कामाकरिता गेल्या होत्या. निंदण सुरू असतानाच दुपारी तीन वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे सर्व महिला मजुरांनी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील वेगवेगळ्या झाडांचा आसरा घेतला. दरम्यान, ज्या झाडाखाली मीरा गायधने व शोभा खाडे उभ्या होत्या त्याच झाडावर वीज कोसळली. यात दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मृत महिलांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी शेताकडे धाव घेऊन दोन्ही महिलांना वरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती वरुड पोलिसांना मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. 

दुसरी घटना गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटाजवळील पाटीलटोला गावालगतच्या शेतात बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. शंकर हेमराज उईके (वय 24) व मीना यादोराव उईके (वय 20, दोघेही रा. पाटीलटोला) हे दोघेही मावसबहीण- भाऊ आहेत. ते पाटीलटोला येथील यादोराव गणू उईके यांच्याकडे राहत होते. शंकरला वडील नाहीत. बुधवारी शंकर व मीना शेतात जनावरांकरिता गवत आणण्यासाठी गेले होते. दुपारी एकच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दोघेही आंब्याच्या झाडाखाली आश्रयाला गेले. याचवेळी झाडाजवळ वीज कोसळली. यात शंकरचा मृत्यू झाला, तर मीना जखमी झाली. तिच्यावर तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

20 घरांतील साहित्य जळाले 

मूल (जि. चंद्रपूर)  : मूल शहरात बुधवारी मुसळधार पावसासोबत वीज कोसळली. डॉ. अझिम यांच्या घरामागे वीज पडली. त्यामुळे परिसरातील सुमारे 20 लोकांच्या घरचे फ्रीज, टीव्ही, पंखे व इतरही इलेक्‍ट्रॉनिक सामान जळून खराब झाले. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमधील अनिल इन्नमवार यांच्या घरासमोरील कडुनिंबाच्या झाडावर वीज पडली. यात संपूर्ण झाड जळाले. 

संपादन - राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha : बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे शड्डू ठोकणार; मराठवाडा ते विदर्भ दौरा ठरला

Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

SCROLL FOR NEXT