file photo 
विदर्भ

ईट सेफ कॉम्पिटिशन : खवय्यांसाठी "कुक ऍट होम' 

भूषण काळे

अमरावती : लॉकडाउन कालावधीत अनेकांनी निरनिराळे छंद जोपासत आपल्यातील कलेला वाव दिला. या काळात सर्वाधिक छंद कुठला जोपासला गेला असेल तर तो खानपानचा. पुरेसा वेळ असल्यामुळे बहुतांश लोक जणू शेफ झाल्याचे समाजमाध्यमावर बघायला मिळते. केलेल्या डीशचा फोटो सोशल मीडियावर यानिमित्ताने शेअर केला जात आहे. शहरात खवैय्येगिरांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या व्ही. आर. फुडीजने एक स्पर्धा सुरू केली आहे. कुक ऍट होम, इट सेफ, असे या स्पर्धेचे नाव आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांनी तयार केलेल्या डीशला त्यांच्यापर्यंतच नव्हे तर इतरांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. 

फेसबुक पेजवर उपक्रम 

व्ही. आर. फुडीजच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात एक विरंगुळा म्हणून विराज देशमुखने फेसबुक पेजवर हा उपक्रम सुरू केला आहे. लॉकडाउनच्या काळात घरोघरी विविध खाद्यपदार्थ बनवण्याची खवय्यांनी जशी स्पर्धाच सुरू केली. पण त्या खाद्यपदार्थांना घरच्यांशिवाय बाहेरही वाव आणि प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम केले ते व्ही. आर. फुडीजच्या माध्यमातून अमरावती फुडीजने. अमरावती फुडीज या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपला जुळलेल्या हजारो सदस्यांना लॉकडाउन सुरू होताच घरोघरी विविध पदार्थ बनवून आपल्या पाककलेचे सादरीकरण या ग्रुपवर करावे, असे आवाहन करण्यात आले होते. आवाहनाला सदस्यांनी भक्कम प्रतिसाद दिला. हजारो लोक घरीच विविध पदार्थ बनवायला लागले आणि आपल्या पाककलेचे सादरीकरण ग्रुपवर प्रसारित करत आहेत. 

फूड फोटोग्राफी 

अमरावती बाहेरील शेकडो सदस्य या ग्रुपमध्ये असून तेदेखील यामध्ये सहभागी झाले आहेत. याला धरूनच ग्रुपवर फूड फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 31 मेपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेचा निकाल 5 जूनला जाहीर होईल. सर्वाधिक लाइक्‍स असलेला फोटो यामध्ये विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. 

हे आहे उद्दिष्ट्य 

स्पर्धेचे उद्दिष्ट म्हणजे घरीच राहून एक विरंगुळा किंवा आपल्या खवैय्येगिरीची आवड पूर्ण करून कलात्मकता वाढवणे व जास्तीत जास्त घरगुती खाद्यपदार्थ सेवन करण्याला वाव मिळणे हे असल्याचे विराज देशमुखने सांगितले. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ कलात्मक पद्धतीने सादरीकरण करून त्याचे फोटो ग्रुपवर रोज प्रकाशित होत असल्याने सर्व सदस्यांचे स्पर्धात्मक विचारभाव वाढत चालले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! पगार अन् पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा ?

Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

SCROLL FOR NEXT