onlinefraud 
विदर्भ

आनंदाची बातमी..! आठ लोकांना मिळाले ऑनलाइन फसवणुकीतील पैसे परत 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहे. सुशिक्षित व्यक्तींनाही त्याचा फटका बसला आहे. परंतु आठ जणांनी वेळेत तक्रार नोंदविल्याने सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्या सात खातेदारांच्या खात्यातून उडविलेली 1 लाख 5 हजारांची रक्कम त्यांना परत मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे हे फसवणुकीचे गुन्हे शहर सायबर पोलिसांनी लॉकडाउन काळात दाखल केलेत. 

लॉकडाउनच्या काळात सायबर पोलिसांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश पोलिस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके व प्रशांत होळकर यांनी दिले होते. त्यानुसार योग्य नियोजन करण्यास सुरुवात झाली. सायबरचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे व रवींद्र सहारे यांनी तक्रारकर्त्यांच्या म्हणण्याची योग्य दखल घेतली. ज्या कंपनीशी तोतयाने व्यवहार करून पैसे उडविले, त्या कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ट्रान्झॅक्‍शन फ्रॉड असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिल्याने हे व्यवहार रद्द करण्यास भाग पाडले. त्यानुसार आठ खातेदारांचे पैसे त्यांच्या बॅंक खात्यात पुन्हा जमा झाले.

राहुल राजू नावंदे 11 हजार 500 रुपये, अश्‍विनकुमार देशमुख 17 हजार 323 रुपये, शेख इरफान 4 हजार 996 रुपये, सत्यम पांडे 24 हजार रुपये, नीलेश आजने 19 हजार 999 रुपये, अभय कडू 4 हजार 500 रुपये, दीपक टिकेकर 19 हजार 999 रुपये, राजेश व्यास 2 हजार रुपये, अशी रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

TRAI SMS Codes : SMS च्या शेवटी P, G, T, S अक्षरांचा अर्थ काय? आत्ताच समजून घ्या नाहीतर होईल हजारो रुपायांची फसवणूक

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Parbhani News: परभणीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; डेपोतील प्रक्रिया कधी बंद तर कधी सुरू

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT