eight swab samples to resned for test 
विदर्भ

अमरावतीचे 8 नमुने पुनर्तपासणीला पाठविणार, हे आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : बुधवारी 80 आणि गुरुवारी 17, असे एकूण 97 नमुने दोन दिवसांत निगेटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी 8 नमुने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या विषाणूविज्ञान प्रयोगशाळेत पुनर्तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. संबंधित नमुने संशयास्पद असल्याने त्याबाबतची पडताळणी केली जात असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

यापूर्वीचे 28 व बुधवारी (ता. आठ) पाठविलेले 12, असे एकूण 40 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. बडनेरा येथे मुक्कामी राहून अकोला जिल्ह्यात गेलेले 9 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बडनेरा येथून घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या अहवालावर बरेच काही अवलंबून असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

हाथीपुरा येथे 2 एप्रिल रोजी मरण पावलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील पाचपैकी तीन व्यक्ती इर्विन रुग्णालयात, तर एक दिल्लीला आहे. पाचव्या व्यक्तीशी संपर्क झालेला आहे, मात्र त्याने त्या कोरोनाबाधिताशी आपला थेट संबंध आल्याचे नाकारलेले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाईलने ट्रॅकिंग करणार

संशयित कोरोनाबाधितांसाठी मोबाईल स्वॉफ्टवेअर विकसित करण्यात आलेले आहे. त्याच्या माध्यमातून संशयितांचे ट्रॅकिंग करून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाणार आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील मात्र अहवाल निगेटिव्ह असलेल्यांनी स्वतंत्र राहावे, हा या मागील हेतू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

लॉकडाऊनवर भाष्य टाळले

लॉकडाउनची मुदत घटविणे अथवा वाढविण्याबाबत सरकारने काही विचारणा केलेली आहे का, असे जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी थेट बोलण्याचे टाळले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाबाधित आढळल्यानंतर संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी तेथून 28 दिवस लॉकडाउन ठेवावा लागतो. अमरावतीचा पहिला कोरोनाबाधित रुग्ण 2 एप्रिलला आढळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT