Eknath Shinde  sakal
विदर्भ

Eknath Shinde : विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देतो,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : भंडारा येथे जलपर्यटनच्या कामाचे भूमिपूजन

गेल्या दोन वर्षांत महायुतीच्या काळात झालेल्या कामांचा पूर्वीच्या सरकारने केलेल्या कामांसोबत तुलना कराल तर, याच सरकारने कितीतरी सरस कामे केल्याचे दिसून येईल. आम्ही विरोधकांच्या टीकेला आपल्या कामातून उत्तर देतो, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : गेल्या दोन वर्षांत महायुतीच्या काळात झालेल्या कामांचा पूर्वीच्या सरकारने केलेल्या कामांसोबत तुलना कराल तर, याच सरकारने कितीतरी सरस कामे केल्याचे दिसून येईल. आम्ही विरोधकांच्या टीकेला आपल्या कामातून उत्तर देतो, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आज, सोमवारी जिल्ह्यातील जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांनी भंडारा व पवनी शहरातील विविध कामांचे ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन केले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील हे जलपर्यटन आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहणार असून, यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच यामुळे हॉटेल, बाजारपेठ, व्यापारात वृद्धी होऊन पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. या सरकारने केंद्राच्या शेतकरी सन्मान निधीत तेवढाच राज्याचा वाटा दिल्याने शेतकऱ्यांना १२००० रुपये मिळत आहेत. असा निधी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

धानाला ७०० रुपये बोनस, प्रोत्साहन निधी न मिळालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच हा निधी देऊ असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच बेरोजगार, महिला सक्षमीकरणासाठी हे सरकार योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या मागणीप्रमाणे परमात्मा एक मंडळाचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त ३ एप्रिलला सुटी जाहीर करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

संभाव्य दुर्घटना टळली

जलपर्यटनाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याकरिता नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री शिंदे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर मिळून आठ जण होते. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार दुसऱ्या बोटीमध्ये पत्रकारांना घेतले. बोट सफर करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली.

तो क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट वाहक गोविंद खवणेकर यांनी सर्वांना एकाच बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली. परंतु, पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एकाच बाजूला वजन वाढल्यामुळे बोटीचा पुढचा भाग थोडा पाण्यात गेला. त्यासोबतच बोटीमध्ये स्क्रूने फिट केलेला सोफासेट पाण्यात पडला. प्रसंगावधान राखून बोट चालक गोविंद खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बसविले त्यानंतर बोट पूर्ववत झाली. त्यामुळे संभाव्य अपघात टळला.

सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’

मी शेतकऱ्याचा मुलगा असून, स्वत:ला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. त्यामुळे राज्यातील कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीसाठी मुंबईतील वर्षा बंगल्याचे दरवाजे कायम खुले असतात. या सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची तुलना करून पाहाल तेव्हा या सरकारने कितीतरी मोठमोठी कामे केल्याचे दिसून येईल. ओबीसी समाजासाठी अधिक निधी देण्याचेही त्यांनी आश्‍वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT