पवनी : घटनास्थळावर आढळलेल्या मृताच्या चपला, मोहफुलांची टोपली.  
विदर्भ

मनाई केल्यानंतरही ती महिला गेली जंगलात...नंतर झाले असे

सकाळ वृत्तसेवा

पवनी (जि. भंडारा) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पवनी तालुक्‍यातील खातखेडा शिवारात मोहफुले गोळा करण्यास गेलेल्या 58 वर्षीय वृद्धेला वाघाने हल्ला करून ठार मारले. जनाबाई वामन मोहदनकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. 2) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.

कोरना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे येथील सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. ग्रामीण भागात पोटाची खळगी भरण्यासाठी गरीब नागरिक जंगलातून मोहफुले व तेंदूपाने गोळा करण्याचे काम करीत आहेत.

वाघाने केला अचानक हल्ला

शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास खातखेडा येथील जनाबाई वामन मोहदनकर गावाजवळील जंगलात मोहफुले गोळा करण्यास गेल्या होत्या. त्यांच्या सोबत गावातील इतर महिला-पुरुषही मोहफुले गोळा करीत होते. दरम्यान झुडपात दडून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून जनाबाईला ठार केले. त्यानंतर काही वेळाने जवळ असलेल्या महिलांना याची माहिती मिळाली. त्यांनी गावकऱ्यांना व वनकर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

वनविभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष

सावरला परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे गावकऱ्यांनी जंगलात जाऊ नये, अशी सूचना वनविभागाने दवंडीद्वारे गावागावात दिली होती. परंतु, गावकरी याकडे दुर्लक्ष करीत असून मोहफुले गोळा करण्यास जंगलात जात आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

हेही वाचा : खरेदी केंद्रावर 32 हजार क्विंटल धान पडून, चुकारेही थकले, सांगा शेतकऱ्यांनी करावे तरी काय?

तालुक्‍यातील दुसरा बळी

मोहफुले गोळा करण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुरुष जंगलात जात आहेत. सावरला परिसरात गेल्या महिनाभरापासून वाघाची दहशत आहे. मागील महिन्यात तर दोन युवकांवर वाघाने हल्ला केला होता. परंतु, त्यांनी जंगलातून पळ काढून स्वतःचा बचाव केला होता. त्यानंतर सावरला येथील ममता शेंडे यांच्यावर मोहफुले गोळा करताना वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. आता खातखेडा येथील जनाबाई मोहदनकर यांचा वाघाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT