Election of Chairman post in Amravati corporation  
विदर्भ

अमरावतीत काँग्रेस सज्ज भाजप मात्र शांत; कोण मारणार बाजी? उद्या होणार सभापतिपदाची निवडणूक

सुधीर भारती

अमरावती ः जिल्हापरिषदेच्या महत्त्वाच्या अशा शिक्षण व बांधकाम समिती सभापतिपदाची निवडणूक शनिवारी (ता.20) होणार आहे. बहुमताच्या आधारे कॉंग्रेस सज्ज झाली असली तरी भाजप आघाडीच्या गोटात मात्र अद्यापही शांतता आहे. निवडणूक लढवावी किंवा नाही याची चाचणी भाजपकडून केली जात आहे.

शिक्षण व बांधकाम समितीच्या सभापती प्रियंका दगडकर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे सभापतिपदाची निवडणूक होवू घातली आहे. बहुमताच्या आधारे कॉंग्रेसकडेच हे पद राहणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे, मात्र भाजपकडून अद्यापही काही चमत्कार होईल का ? याची चाचपणी केली जात आहे. 

पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हापरिषद तथा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांची शनिवारी सकाळी या संदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवाराचे नाव फायनल होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

त्यासाठी अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग आला असून कॉंग्रेस व आघाडीच्या सर्व सदस्यांना शनिवारी सकाळी शासकीय बंगल्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तेथून दुपारी 1 वाजताच्या सुमारास जिल्हापरिषदेत नामांकन तसेच वेळ पडल्यास मतदानासाठी सदस्यांना आणले जाईल.

सुरेश नीमकर यांना कौल

माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांचे निकटवर्तीय सुरेश नीमकर यांची सभापतिपदी निवड होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. सुरेश नीमकर हे पहिल्यांदाच सदस्य झाले असून ते धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील तळगाव दशासर सर्कलचे प्रतिनिधित्व करतात.

असे आहे संख्याबळ

एकूण सदस्यसंख्या 59
- सत्ताधारी आघाडी ः कॉंग्रेस 26, राष्ट्रवादी 5, शिवसेना 3, अपक्ष 1 (एकूण 35)
- विरोधी आघाडी ः भाजप 13, प्रहार 5, युवा स्वाभिमान 2, बसपा 1 (एकूण 21)
- रिक्तपदे ः 3

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Election 2026 : तामिळनाडूत 'विजय युग' सुरू, सरकार स्थापनेचा केला दावा; राहूल गांधींची साथ मिळणार ?

Pargaon Crime : विवाहित मुलीचे दुसरे लग्न लाऊन देण्याच्या उद्देशाने वडीलांनीच केले अपहरण; वडीलांसह सात आरोपींना चार तासांत अटक

ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास, वाहतूक कोलमडली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Tailoring Business : रेडिमेडच्या जमान्यात शिवणकाम व्यवसायाला नवसंजीवनी! ‘परफेक्ट फिटिंग’साठी महिलांची पसंती

SCROLL FOR NEXT