नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या हप्त्यापोटी २ हजार २९७ कोटी ६ लाख ३७ वितरित केले. येत्या दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारने निवडणूक आयोगाला मदत वाटपास परवानगी देण्याकरता पत्र दिले होते. आयोगाने आज ती मान्य केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतीचे तसेच ग्रामीण भागातील घरे, रस्ते, पूल यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. तसेच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
दिवाळीआधी पहिला हप्ता देण्यात येणार आहे. नुकसानीचे उर्वरित रक्कम नंतर दिली जाणार आहे. संपूर्ण नुकसानभरपाई दिवाळी आधी देण्याची तयारी होती, मात्र अचानक निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे काही अडचण निर्माण झाली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांकडून मदत वाटपाच्या आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षातील नेते विदर्भाला केवळ ८ कोटी मिळणार असल्याचा चुकीचा प्रचार करीत आहेत. विदर्भाला ५६६ कोटींची मदत मिळणार आहे. केंद्र सरकार अतिवृष्टीसाठी राज्य सरकारला मदत करीत नाहीत. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते साधे पत्र देखील केंद्राला लिहत नाही. त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, असेही ते म्हणाले.
विभागनिहाय मदत
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.