gdc17p05_C. 
विदर्भ

गडचिरोलीच्या तलावाला अतिक्रमणाचा विळखा, घाणीचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मोठ्या संख्येने तलाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयात अर्थात गडचिरोली शहरात भव्य तलाव आहे. मात्र, या तलावाची दुर्दशा सुरू असून, अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. घाणीचे साम्राज्य आहे. काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. पण, काही दिवसांतच ते बंद पडले. तेव्हापासून या तलावाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा आहे.

गडचिरोली शहरात गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर डाव्या बाजूला भव्य तलाव आहे. हा तलाव अतिशय विस्तीर्ण असून शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. पण, या महत्त्वाच्या तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे कधीच लक्ष देण्यात आले नाही. फक्त गणेशविसर्जनाच्या दिवसांत येथील घाटाची थोडी डागडुजी व पाळीची दुरुस्ती करण्यात येते. खरेतर या तलावाची नीट देखभाल व सौंदर्यीकरण झाल्यास नागरिकांना विरंगुळ्यासोबतच एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून या जागेचा विकास करता येऊ शकतो.

अनेकांनी केले अतिक्रमण

काही वर्षांपूर्वी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते. चंद्रपुरातील रामाळा तलावाच्या धर्तीवर येथे सौंदर्यीकरण करून बागेच्या निर्मितीलाही सुरुवात झाली होती. पण, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. अचानक हे काम बंद करण्यात आले. कामगार, कंत्राटदाराने गाशा गुंडाळला. तेव्हापासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विषय कधीच पटलावर आला नाही. या तलावाच्या एका भागाला गोकुळनगर असून, त्या बाजूने या तलावावर अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्या घरांवरही अद्याप कारवाई झाली नाही. शहरात अनेकदा अतिक्रमण हटाव मोहिमा काढण्यात येतात. पण, या अतिक्रमणधारकांवर कोणतीच कारवाई होत नाही.

सांडपाणी जाते तलावात

शिवाय शहरातील अनेक नाल्यांचे घाण पाणी व घरांतील सांडपाणी याच तलावात जाते. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. त्यामुळे या तलावाचे सौंदर्यीकरण करून येथे बोटिगची व्यवस्था करत एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पार्किंगचीही दुर्दशा

या तलावाचे सौंदर्यीकरण सुरू असताना येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी भव्य पार्किंग तयार करण्यात आली. कोरोनाच्या सावटापूर्वी दर रविवारी कारगिल चौक परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारातील ग्राहकांच्या वाहनांची सोय इथेच करण्यात आली होती. पण, या पार्किंगचीही दुर्दशा होत असून अनेक नागरिक या जागेचा उपयोग उघड्यावर शौचासाठी करतात. याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून लाज वाटते…” महेश मांजरेकरांच्या एका वाक्याने खळबळ, म्हणाले "आता आता विकास नको!"

Kharmas 2026: 14 जानेवारीपूर्वी 'हे' उपाय अवश्य करा! लग्नातील सर्व अडथळे क्षणार्धात होतील दूर, अवघ्या काही दिवसांत येईल स्थळ अन् लग्न पक्कं!

Mutual Fund : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! JioBlackRock चे 2 नवे म्युच्युअल फंड लाँच; पैसा सुरक्षित ठेवण्याची नवी संधी?

Digital Arrest : नाना पाटेकरांनी चोराकडूनच उकळले ६० हजार रुपये! डिजिटल अरेस्टला चकवा देण्याची अनोखी युक्ती

अमेरिकेच्या हिताविरोधात काम! ६६ जागतिक संघटनामधून बाहेर पडण्याची ट्रम्प यांची घोषणा; भारताच्या नेतृत्वाखालील संस्थेचाही समावेश

SCROLL FOR NEXT