साकोली : गॅरेजमध्ये ट्रॅक्‍टर दुरुस्ती करताना हातझाडे. 
विदर्भ

अभियंता युवती बनली भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला मेकॅनिक...वडिलांच्या गॅरेजमध्ये करीत आहे काम

मनीषा काशिवार

साकोली (जि. भंडारा) : मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून नोकरीच्या मागे न धावता वडिलांच्याच गॅरेजमध्ये ट्रॅक्‍टर दुरुस्तीचे काम करण्यास धनश्रीने सुरुवात केली आहे. या युगातील महिला वर्कशॉपमधील अतिजड कामातही मागे नाहीत, हे तिने आपल्या कामातून दाखवून दिले आहे. तिची जिद्द व चिकाटीबद्दल शेतकरी व मान्यवरांकडून कौतुक केले जात आहे.

चांदोरी (उसगाव) येथील धनश्री प्रेमलाल हातझाडे (वय २२) हिने बीई (मेकॅनिकल) पर्यंत शिक्षण घेतले. तिच्या वडिलांचे साकोलीत ट्रॅक्‍टर दुरुस्तीचे गॅरेज आहे. तिने शिक्षण घेतल्यावर आपल्या वडिलांना मदत करण्याचा संकल्प केला होता.

हेही वाचा : यशोगाथा : परंपरागत व्यवसायाला दिली आधुनिकतेची जोड आणि घेतली या व्यवसायात भरारी

वडिलाला मुलीची मदत

इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यावर तीन महिन्यांपासून वडिलांच्या गॅरेजमध्ये त्यांना ती मदत करीत आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर दुरुस्तीच्या कामात तिच्या वडिलांना मुलीची मदत मिळत असल्याने त्यांना समाधान वाटत आहे.

जिल्ह्यातील पहिली महिला मेकॅनिक

ट्रॅक्‍टर दुरुस्तीचे चक्क जडकाम करणारी ती जिल्ह्यातील पहिली महिला मेकॅनिक झाली आहे. तिच्या वडिलांनीसुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. त्यानंतर नोकरी न करता येथे स्वतःचे गॅरेज टाकले आहे. त्यांच्या प्रेरणेतून धनश्रीनेसुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. आता ती वडिलांच्या गॅरेजमध्ये त्यांना मदत करीत आहे.

गरीब परिस्थितीत घेतले शिक्षण

चांदोरी येथील प्रेमलाल हातझाडे यांना इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घ्यायचे होते. परंतु, घरची परिस्थिती बेताचीच होती. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यावेळी पैसे नसल्याने ते निराश झाले होते. त्याकाळात स्व. डॉ. कालिदास कापगते यांनी येथील बसस्थानकावर १४०० रुपये नेऊन दिले होते. त्यानंतर त्यांनी नागपूरला जाऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, अशी आठवण धनश्रीचे वडील प्रेमलाल हातझाडे यांनी सांगितली.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT