file photo
file photo 
विदर्भ

भंडाऱ्यात होणार धानाच्या तणसापासून इथेनॉल निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकार भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी (ता. 16) बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी शंतनू गोयल, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधीकारी अन्बलगन व भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक मिलिंद पतके उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पासाठी आवश्‍यक जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
सदर प्रकल्प सुमारे 1500 कोटींचा असून यासाठी 100 एकर जमिनीची आवश्‍यकता आहे. या प्रकल्पासाठी भविष्याची गरज म्हणून अधिकची जमीनसुद्धा उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी देण्यात आली. एमआयडीसी यासाठी सर्व सहकार्य करणार आहे. या प्रकल्पातून बायोगॅस निर्मिती होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. पालकमंत्री परिणय फुके यांनी या प्रकल्पासाठी अथक प्रयत्न केले असून भंडारा जिल्ह्याच्या विकासाला यामुळे गती मिळेल. देशभरात अशाप्रकारचे 12 प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी चार प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहेत.
तणसाची भरपूर उपलब्धता
भंडारा जिल्ह्यात 3.84 लाख टन तणस तर गोंदिया जिल्ह्यात 3.46 लाख टन तणस उपलब्ध आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगात आणल्यानंतर उर्वरित तणस जाळून टाकण्यात येते. त्यामुळे शिल्लक तणसेपासून इथेनॉल व गॅसची निर्मिती शक्‍य होणार आहे. तणसाची बांधणी करणे, मशीनच्या साहाय्याने प्रेस करून बेल्स बनवणे यासारखे पूरक उद्योगसुद्धा यानिमित्त जिल्ह्यात उभे राहणार असल्याने स्थानिकांच्या रोजगारात भर पडेल. या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT