murtizapur.jpg
murtizapur.jpg 
विदर्भ

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सज्ज असेही गाव

अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि. अकोला) : शहरी भागात थैमान घालणारा कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही घुसखोरी करण्याच्या पावित्र्यात असून, या तालुक्यातील हिवरा कोरडे या गावाने मात्र संकटपूर्व नियोजनाचा वस्तुपाठ प्रत्यक्ष कृतीतून इतर खेड्यांना घालून दिला आहे.

चिमुकल्याने हात धुण्याचे महत्त्व दिले पटवून
आयआटीज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या समन्वयक सहभागातून शेती, स्वावलंबन, वृक्षलागवड, गोपालनादी उपक्रमांमधून ग्रामविकास साधणे अनुस्यूत असणाऱ्या पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या उन्नत भारत अभियान या डूरीम प्रोजेक्ट मध्ये सहभागी असलेल्या या लहानश्या गावातील लहान लहान मुले, महिला कोविड-19 विषाणूसंदर्भात जागृत व शिक्षीत आहेत. अनुज कोरडे या चिमुकल्याने सुंदर चित्र काढून प्रवेशद्वारावर लावत हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. बंडू डाखोरे व सुरज कोरडे यांनी जेवणाआधी डेटाॅलच्या पाण्याने हात धुवायचे प्रशिक्षण देऊन मुलांना डेटाॅल बाटल्यांचे वितरण केले. सर्वांना स्वछतेचे धडे दिले. राजेंद्र कोरडे यांनी सर्व ग्रामस्थांना स्व. आबासाहेब कोरडे सभागृहात एकत्र करून हात धुण्याची शास्त्रशुध्द पद्धत व करोना या आजाराची सविस्तर माहीती व त्या विषयी आरोग्याची कशी काळजी घ्यावयाची ही सविस्तर माहिती लॉकडाउन पूर्वीच ता.13 ते 17 मार्च दरम्यान दिली.

तपासणीनंतरच गावात प्रवेश
उन्नत भारत अभियानांतर्गत अकोल्याचे अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय व दम्माणी नेत्र रुग्णालयाच्या वतीने संयुक्त विद्यमाने गत मंगळवारी (ता.17) ला स्व.कुमुदिनी वामनराव कोरडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ आयोजित मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. पद्मभूषण डाॅ. विजय भटकर या कार्यक्रमात येणार होते, मात्र कार्यबाहूल्यामुळे येऊ न शकल्यामुळे त्यांचा 20 मिनीटांचा वेब संदेश व्हिडीओ काॅनफरनसींग द्वारे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. 22 मार्चला संपूर्ण बंद पाळण्यात आला. ग्रामपंचायतीने कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना रस्ते, नाल्या व गावांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. बाहेरवावरुन आलेल्या लोकांना व पाहुणे मंडळीला आधी मूर्तिजापुरातील रूग्णालयात पाठवून तपासणी केली व नंतरच गावात प्रवेश दिला.

ग्रामस्थांच्या मागण्या
गावातील बंद असलेले प्राथमिक इरोग्य केंद्र सुरू करावे. शहराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा.
पेढी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याला 10 वर्षापासून बंद गेट बसवावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT