विदर्भ

माजी आमदार धवड यांच्या घरी छापे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : नवोदय बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह काही संचालकांच्या घरी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागातील पथकाने छापा मारला. धवड यांच्या महागड्या दोन आलिशान कार जप्त केल्या. तसेच पोलिसांनी बॅंकेच्या मूल्यधारकाला अटक केली असून त्याला 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. हे छापासत्र व जप्तीची कारवाई सुरूच आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवोदय अर्बन क्रेडिट को-ऑप बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्या धंतोलीतील निवासस्थानी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सलग दोन दिवस पोलिसांनी छापेमारी केली. यात आरोपी असलेले धवड दाम्पत्य पोलिसांना मिळाले नाही. त्यांच्या परिवारातील सदस्यांना अशोक धवड आणि किरण धवड यांच्याबाबत पोलिसांनी विचारणा केली. मात्र, परिवारातील सदस्यांनी ते कुठे आहेत, त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी धवड यांच्या नावावर असलेल्या दोन आलिशान कार जप्त केल्या. नवोदय बॅंकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यात बॅंकेचे अध्यक्ष आणि संचालकांसह 25 ते 30 जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यात शहरातील काही नामवंत व्यावसायिकांचाही समावेश आहे. या सर्वांना पोलिस लवकरच अटक करतील, असे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. धवड दाम्पत्य तसेच अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासून ठिकठिकाणी छापेमारी केली. त्यात एका ठिकाणी पोलिसांना प्रसाद पिंपळे नामक संचालक हाती लागला. त्याला पोलिसांनी अटक केली. प्रसाद पिंपळे यांची बॅंकेने मूल्यनिर्धारक म्हणून नेमणूक केली होती. कर्जदाराने ठेवलेल्या तारणाचे मूल्यमापन करून कर्जदाराला किती कर्ज द्यायचे याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. परंतु, ज्या कर्जदाराकडे दीड कोटींचे तारण आहे अशा कर्जदाराच्या तारणावर मूल्य वाढवून दिले. ते मूल्य 15 कोटींचे आहे असे सांगून त्या कर्जदाराला सहा कोटींचे कर्ज दिले. अशाप्रकारे पिंपळेने सुमारे शंभर ते दीडशे कर्जदारांचे मूल्य वाढवून त्यांना कोट्‌यवधीचे कर्ज मंजूर केले आणि बॅंकेला डबघाईस आणले. अशोक धवड यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शनिवारी शोधमोहीम राबवली, परंतु, ते पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. धवड हे बाहेरगावी पळून जाऊ शकतात याची शक्‍यता असल्याने पोलिस पथके बाहेरगावी पाठविण्यात आली आहेत.
अटकपूर्व जामीन नाकारला
याच प्रकरणात दोषी असलेले बॅंकेचे संचालक आणि माजी नगरसेवक विजय हरीभाऊ बाभरे आणि राजेंद्र शंकरराव पिंपळकर यांनाही न्यायाधीश पाटील यांनी अटकपूर्व जामीन नाकारला. अटक टाळण्यासाठी दोघांनीही जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जांवर शनिवारी सुनावणी होऊन न्यायाधीश पाटील यांनी त्यांना अटकपूर्व जामीन नाकारून त्यांचा अर्ज फेटाळून लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT