Amravati University 
विदर्भ

अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; मंगळवारी जाहीर होणार नवे वेळापत्रक 

सुधीर भारती

अमरावती ः परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रवेशपत्रातील तांत्रिक चुकांमुळे अखेर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आली. परीक्षेचे नवीन वेळापत्रक मंगळवारी (ता. १३) जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. पूर्वीच्या नियोजनानुसार सोमवारपासून (ता. १२) परीक्षांना सुरुवात होणार होती. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष तसेच अंतिम सत्रासह अनुशेषातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गोंधळ निर्माण झाला होता. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्रच मिळालेले नाहीत, तर काहींच्या प्रवेशपत्रात चुकीचे विषय आले आहेत. काहींचे परीक्षेचे माध्यम बदलण्यात आले. अशावेळी नेमकी परीक्षा कोणत्या विषयाची द्यायची, हा प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला होता.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अंतिम वर्ष व सत्राची ७५ हजारांहून अधिक तर अनुशेषाची धरून सव्वा लाखांवर विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी केली आहे. कोरोना संक्रमण व नंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रखडलेल्या परीक्षा सोमवारपासून (ता. १२) सुरू करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. मात्र, तेसुद्धा तांत्रिक चुकांच्या गोंधळामुळे कोलमडले. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाला घ्यावा लागला. 

विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाकडे या तक्रारींचा ओघ वाढल्याने रविवारी (ता. ११) परीक्षा विभागाच्या बैठकीत सोमवारपासून (ता. १२) सुरू होणाऱ्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित करून त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तांत्रिक चुका दुरुस्त करून मंगळवारी (ता. १३) नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. आता सर्व परीक्षा नव्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. 

विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींवर सखोल चौकशी करण्यात आली. तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- डॉ. हेमंत देशमुख, परीक्षा नियंत्रक 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

SCROLL FOR NEXT