Fake account on Facebook in the name of the Mayor of Amravati 
विदर्भ

अमरावतीच्या महापौरांच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट; केली पैशांची मागणी

कृष्णा लोखंडे

अमरावती : अमरावती महापालिकेचे महापौर चेतन गावंडे यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. महापौरांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार केली आहे. तसेच या अकाउंटवर कुणीही व्यवहार करू नये, असे आवाहन केले आहे.

अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर अकाऊंट तयार केले आहे. त्या आधारे त्याने महापौरांच्या संबंधित लोकांना या अकाऊंटहून संदेश पाठवून आपण अडचणीत असल्याचे सांगत पैशांची मागणी केली. हा संदेश मिळाल्यानंतर काही जणांनी बुधवारी (ता. २५) सकाळी महापौरांसोबत संपर्क साधून त्यांना विचारणा केली. या चौकशीने स्वतः महापौर चक्रावून गेले.

त्यांनी कुणालाच पैसे मागितले नसताना त्यांच्या अकाऊंटवरून पैसे मागण्याचे संदेश गेले कसे याची तपासणी सुरू केली. त्यांनी त्यांचे सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट व मेसेंजर चेक केले. आपल्या नावे फेक अकाउंट तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलकडे केली.

या फेक अकाउंटवरील संदेश वाचून कुणीही आर्थिक व्यवहार करू नये, तसेच या अकाउंटवर प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे. दरम्यान सायबर सेलने तपास आरंभ केला असून फेक अकाउंट बंद केले आहे. असे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer ला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज! नेमकं काय घडलं, भारतात कधी परतणार? BCCI ने दिले नवे अपडेट्स

PM Modi Video Viral : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल! गमछा हवेत फिरवत शेतकऱ्यांना दिला खास संदेश

Business Strategy : स्टार्टअपचा गेमचेंजेर! डिजिटल युगात टिकायचंय? मग शिका सोशल मीडियाचं मार्केटिंग कौशल्य

भीषण दुर्घटना : एकादशीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी, चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

Viral News: ‘नाक कटवा’ची दहशत… भूत की माणूस? नेमकं कोण कापतंय लोकांची नाकं? पीडितांनी सांगितली भीषण कहाणी

SCROLL FOR NEXT