Fake police looted man in Amravati  
विदर्भ

'मी खुपिया पोलिस आहे सगळ्या वस्तू बाहेर काढा' म्हणत केली चेकिंग; सत्य समोर येताच सरकली पायाखालची जमीन 

कृष्णा लोखंडे

अमरावती ः गावाचे वातावरण बिघडले असल्याचे सांगून एका व्यक्तीला त्याच्याकडील ऐवज एका रुमालात बांधून देऊन तो ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना वरुड येथे घडली.

वरुड येथील अरुण तडस यांनी या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. सोमवारी सकाळी 11.45 वाजता ते नगरपरिषद कार्यालयाकडे जात असताना गुणवंत मेडिकल जवळ एका व्यक्तीने त्यांना थांबविले. कपड्याच्या दुकानात शिंद्याला चाकू मारला आहे. गावातील वातावरण खराब झाले आहे. मी खुपिया पोलिस अधिकारी आहे, असे सांगून त्या व्यक्तीने अरुण तडस यांची चेकिंग सुरू केली. 

त्यांच्या खिशातील मोबाईल, पैशाचे पाकीट व अन्य वस्तू तपासून सर्व वस्तू एका रुमालात बांधण्यास सांगितले, त्यात सोन्याची चेन तसेच लॉकेट व अंगठीसुद्धा होती. ही सामग्री रुमालात बांधून ती श्री. तडस यांच्या खिशात ठेवण्यात आली. त्यानंतर ते नगरपरिषदेत गेले असता त्यांनी त्याठिकाणी रुमाल काढून पाहिला असता त्यातील सोन्याची चेन तसेच लॉकेट चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

संबंधित तोतया पोलिसाने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी या घटनेची तक्रार वरुड पोलिस ठाण्यात केली. माझी चेकिंग करण्याआधी त्या व्यक्तीने आणखी एका व्यक्तीची चेकिंग केली होती. त्यामुळे त्यांचे या प्रकरणात संगनमत असावे, असा संशय त्यांनी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीतून व्यक्त केला. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करून त्या तोतया पोलिसाचा शोध सुरू केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीत टीम ओमी कलानीचा शिंदेसेनेला जाहीर पाठिंबा!

Ganpati Visarjan 2025 Updates : अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Video Viral: ट्रेनमध्ये मुलीला अश्लील हावभाव करताना विकृत कॅमेऱ्यात कैद, उतरण्यापूर्वी फोटोही काढले... संतापजनक व्हिडिओ

बँक ऑफ इंडिया शाखेला मोठी आग; घटनास्थळी खळबळ, कागदपत्रांची यादी जळाली

SCROLL FOR NEXT