family in chandrapur got 1500 years old Rajmudra read full story  
विदर्भ

घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का.. 

निलेश झाडे

धाबा(जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्याला अतिशय प्राचीन इतिहास आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, हृहय,परमार ,नाग,गोंड, भोसले या राजांची येथे कधीकाळी सत्ता होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ऐतिहासिक ठेवा विखुरलेला आहे. मात्र आता जिल्ह्याच्या भूगर्भात दडून बसलेला इतिहास हळूहळू उजेडात येत आहे. अशीच एक प्राचीन गोष्ट एका कुटुंबाला सापडली आहे.    

वडिलांचा मृत्यूनंतर मुलाने वडिलांचा खोलीतील संदूक उघडला. त्यात काही नाणे आणि तांब्याची गोलाकार वस्तू सापडली. या वस्तूचा इतिहास समोर आला अन सारेच अवाक झाले. गोंडपिपरी तालुक्‍यातील प्रकाश उराडे यांच्याकडे अतिशय महत्वाचा ऐतिहासिक ठेवा पडून होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रंजित उराडे याने वडिलांचा खोलीत असलेली जुने संदूक खोलले. या संदूकात 60 ग्रम वजनाची,गोलाकार आकारातील ताब्यांची वस्तू सापडली.

काय होती ही वस्तू 

ती साधी वस्तू नसून चक्क राजमुद्रा निघाली. वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितीय यांची ती राजमुद्रा होती. पाचव्या शतकातील वाकाटकांची ही राजमुद्रा चंद्रपूर जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात भर घालणारी ठरणार आहे. या राजमुद्रेवर राज्यलक्ष्मीचे चित्र अंकित असून ब्राह्मी लिपीत लेख कोरलेला आहे. 

एका महान सम्राटाचा इतिहास आला उजेडात 

ही तांब्याची वस्तू 7 से.मि. लांब,3 से.मि. रुंदीची होती. त्यावर कमलपुष्पावर विराजमान असलेल्या देवीचे चित्र अंकित आहे. त्या देवीच्या उजव्या हातात कमलपुष्प आहे. चित्राचा खाली ब्राह्मी लिपीत लेख कोरलेला आहे. ही तांब्याची वस्तू महत्वाची वाटल्याने रंजित उराडे यांनी इतिहास अभ्यासक नीलेश झाडे यांची भेट घेतली. झाडे यांनी याचे निरीक्षण केले. झाडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. पुणे येथील अमोल बनकर, अशोक सिंह ठाकूर यांनी तांब्याचा त्या गोलाकार वस्तूवर कोरलेल्या लेखाचे वाचन केले आणि एका महान सम्राटाचा इतिहास उजेडात आला. 

वाकाटक राजा पृथ्वीसेन ( द्वितीय ) ची राजमुद्रा 

उराडे यांनी जतन करून ठेवलेली ती वस्तू वाकाटक राजवंशातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितिय यांची राजमुद्रा आहे. पृथ्वीसेनाचा कालखंड इ.स.475-495 होता. पृथ्वीसेन यांचे ताम्रपट बालाघाट,मांढळ,माहूरझरी येथे मिळाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे वाकाटकांची राजधानी होती. पृथ्वीसेन द्वितीय याची राजमुद्रा चंद्रपूर जिल्ह्यात सापडल्याने चंद्रपूरचा प्राचीन इतिहास मोठी भर पडली आहे. 

काय लिहिलं लेखात... 

राजमुद्रेवर सुरवातीलाच राजलक्ष्मीचे चित्र कोरले आहे.अशाप्रकारचे चित्र गुप्त राजवटीतील सोन्यांचा नाण्यांवर अंकित असायचे. त्याखाली ब्राह्मी लिपीत लेख कोरला आहे. या लेखाचे वाचन पुणे येथील इंडोलॉजीस्ट अमोल बनकर, इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी केले. लेखात " नरेंद्रषेण याचा पुत्र पृथ्वीषेणा यांची ही राजमुद्रा " आहे असे लिहिले आहे.  

 संपादन - अथर्व महांकाळ  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT