family dispute over money elder brother killed younger brother wardha police esakal
विदर्भ

Crime News : पैशासाठी थोरल्याने केला धाकट्याचा खून

घरकुलाचा वाद गेला विकोपाला; पुलगाव पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

वर्धा - आईला मिळालेल्या घरकुलाच्या पैशावरून झालेल्या वादात थोरल्याने धाकट्या भावावर लाकडी रापटरने वार करून खून केला. ही घटना पुलगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रोहणा गावात शनिवारी (ता. २५) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. रणजीत म्हैसकर (वय ३२) रा. रोहणा असे मृताचे तर दिनेश म्हैसकर असे मारेकरीचे नाव आहे.

पोलिससुत्रानुसार,रणजीत आणि दिनेश दोघे सख्ये भाऊ. परंतु, दोघात पटत नसल्याने दोघेही वेगळे राहत होते. त्याची आई रमाबाई या धाकटा मुलगा रणजीत बरोबर राहात होती. रमाबाईच्या नावावर घरकुल लागून आले. घराच्या बांधकामासंदर्भातील सर्व व्यवहार रमाबाईने लहान मुलाकडे न देता थोरल्या मुलाकडे सोपविला.

लहान मुलाकडे राहत असताना व्यवहार मात्र मोठ्या मुलाकडे दिल्याने रणजित आणि दिनेश यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला. या वादात दिनेशने लाकडी रापटरने रणजितला मारहाण केली. यात रणजितच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताची आई रमा यांनी दिलेल्या तक्रारी वरून पुलगाव पोलिसात खूनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Passport V2.0: पासपोर्ट सेवेत मोठा बदल! भारत सरकारची मोठी घोषणा, जुन्या पासपोर्टचे काय होणार?

IND vs SA 1st Test: शुभमन गिलला नेमकं काय झालं, एका चौकारानंतर अचानक सोडलेलं मैदान! BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Whatsapp Chat Leak Reason: व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायवेट चॅट 'या' कारणाने होतायत लिक! तुम्हीही करताय का ही चूक?

Kolhapur News: ऊस वाहतूक वाहनांचा डेंजर झोन: खड्डे, अंधार आणि अस्ताव्यस्त पार्किंगने वाढला अपघातांचा धोका!

Thane News: ४५ मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! ठाणे ते भिवंडी मार्गाची कोंडी सुटणार; MMRDAची नवी योजना

SCROLL FOR NEXT