The famous Mama Bhacha Yatra in Gondia breaks this year
The famous Mama Bhacha Yatra in Gondia breaks this year 
विदर्भ

मामा-भाचा यात्रेला यंदा ब्रेक; दैवत असलेली दोन टेंभूर्णीची झाडे ४० ते ५० फूट उंच वाढलेली

मुनेश्‍वर कुकडे

सडक अर्जुनी/कोसमतोंडी (जि. गोंदिया) : नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर कोसमतोंडी ते साकोली मार्गावरील गिरोला (हेटी) येथे १ व २ जानेवारीला मामा-भाचा यात्रा नित्यनेमाने भरत होती. या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी असायची. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

गिरोला (हेटी) या गावाच्या घनदाट जंगलात निसर्गाच्या सानिध्यात १ व २ जानेवारीला ही यात्रा भरायची. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ते नागपूरपासून हजारो भाविक या यात्रेत सहभागी व्हायचे. या यात्रेचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे भाविकांसाठी आराध्य दैवत असलेली दोन टेंभूर्णीची झाडे आहेत. ४० ते ५० फूट उंच वाढलेल्या या गगनचुंबी वृक्षांचे वैशिष्ट्ये म्हणजे दोन्ही झाडे सरळ व सारखीच वाढलेली आहेत. त्यांना मधात फाटे फुटले नाहीत.

निसर्गाला परमेश्‍वर मानण्याच्या श्रद्धेमुळे जंगलतोडीवर आपोआपच नियंत्रण आले. गावकऱ्यांच्या श्रद्धेपोटी हे स्थान देवस्थान बनले. परंतु, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गिरोला येथील ग्रामपंचायतीसह नागरिकांनी यावर्षी मामा-भाचा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मामा-भाचा’ आख्यायिका

गिरोला (हेटी) येथील रहिवासी मामा, भाचा जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते. त्याकाळी वाघ, अस्वल यासारखी श्‍वापदे इथे होती. जंगलामध्ये गेलेले मामा-भाचे गावात परतलेच नाही. गावकऱ्यांनी जंगलात शोधाशोध केली. परंतु, तिथे त्यांचे शरीरही मिळाले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू गावकऱ्यांसाठी रहस्यमय ठरला.

याच जंगलात रस्त्याच्या कडेला दोन टेंभुर्णीची झाडे एकमेकांजवळच चार ते पाच फूट अंतरावर उंच वाढली. काहींनी हे झाड कापण्यासाठी कुऱ्हाडीने घाव घातला असता रक्तासारखा लाल स्राव झाडामधून वाहू लागला. दुसऱ्या झाडामधून दुधासारखा पांढरा स्राव वाहायला लागला. त्यानंतर ती झाडे न तोडता गावकऱ्यांनी त्यांना ‘मामा-भाचा’ अशी नावे दिली.

तिथे दोन मूर्तींची स्थापना केली. लोक त्यांची पूजा करू लागले व श्रद्धेने नवस फेडू लागले. आपसूकच भाविकांची गर्दी वाढू लागली. आता हजारोंच्या संख्येने भाविक तिथे दर्शनासाठी येतात.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT